शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

सभागृह हवेत बांधणार काय?

By admin | Updated: July 21, 2014 00:02 IST

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मौजा शहापूर येथील ग्राम सचिवालयाजवळ लागून असलेल्या परमात्मा एक सेवक मंडळ द्वारा अतिक्रमण करुन तयार करण्यात आलेल्या मानव मंदिराजवळ

ग्राम पंचायतीचा ठराव कोणासाठी : सार्वजनिक सभागृहाकरिता जिल्हा नियोजन समितीचीही मान्यता दिनेश भुरे - शहापूर आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मौजा शहापूर येथील ग्राम सचिवालयाजवळ लागून असलेल्या परमात्मा एक सेवक मंडळ द्वारा अतिक्रमण करुन तयार करण्यात आलेल्या मानव मंदिराजवळ सभागृह बांधकामास जिल्हा नियोजन समितीने प्रशासकीय मंजुरी दिली असली तरी हे स भागृह नेमके कुठे व कोणासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या जागेवर सभागृह बांधकाम करावयाचे आहे तिथे मुळात जागाच शिल्लक नाही. या भूखंडावरील जागा आधिच अतिक्रमण करुन गिळंकृत करण्यात आली आहे.कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा ने जिल्हा नियोजन समितीला सादर केलेल्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०१३-२०१४ च्या नवीन अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्याकरिता सादर केलेल्या दि. १० जानेवारी २०१३ च्या पत्रातील अनुक्रमांक १ नुसार मौजा शहापूर येथे मानव मंदिराजवळ सभागृहाचे बांधकाम करण्यासंबंधी ३ लक्ष नव्यान्नव हजार दोनशे दहा रुपयाचा प्रस्ताव सादर केला. त्याला जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी प्राप्त होऊन पुढील आदेशाकरीता सादर करण्यात आले.सा.बां. विभागाने सादर केलेल्या प्रस्तावात ज्या जागेवर सभागृह बांधावयाचे आहे, ती जागा मुळात झुडपी जंगलाची असून सदर जागा शौचाकरीता व जनावरे चराईकरीता असल्याचे ७/१२ उताऱ्यावरुन दिसून येते.प्रस्तावासोबत जोडलेल्या मौजा शहापूर येथील गट क्रमांक ४ मध्ये एकूण ०.०८ हे.आर. जागा असून खातेदार सरकार आहे. त्यात झुडपी जंगल, गवत असा स्पष्ट उल्लेख आहे. गावठाणाला लागून असलेली ही मोक्याची जागा सध्या ग्रामपंचायतच्या ताब्यात असून तिथे नर्सरी, पशुुचिकित्सालय, अंगणवाडी केंद्र, ग्रामसचिवालयच्या इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. ह्यापैकी ग्रामसचिवालयालगत असलेल्या शिल्लक जागेवर परमात्मा एक सेवक मंडळाने अतिक्रमण करुन मानव मंदिराची (चर्चास्थळ) निर्मिती करण्यात आलेली होती. काही वर्ष मानव मंदिर अस्तित्वात असेपर्यंत सदर जागेचा वापर सार्वजनिकरित्या परमात्मा एक सेवक मंडळाद्वारा वापरला जायचा. आमदार निधी उपलब्ध होताना दिसताच सदर मानव मंदिर पाडण्यात आले. त्यानंतर मंडळातील आपसी मतभेद व ग्रामपंचायतचा हस्तक्षेप यात समन्वय साधला न गेल्यामुळे येणाऱ्या निधीची वाट न पाहता पुन्हा तिथे मानव मंदिर उभारण्याच्या स्थानिक परमात्मा एक सेवक मंडळच्या हालचाली सुरू झाल्या. सद्यस्थितीत बांधकाम प्राथमिक अवस्थेत असल्याची माहिती आहे.मंजुरी प्राप्त प्रस्तावित सभागृह हे ग्रामपंचायतच्या अखत्यारित येणार असले तरी ते वास्तविक मानव मंदिर या चर्चास्थळाकरीता असल्याचे बोलले जाते. यापूर्वीच्या ग्रामपंचायत समितीने चर्चास्थळीच सभागृह बांधण्याचा ठराव घेतला होता. मात्र मध्यंतरी झालेल्या सत्तांतरामुळे नवीन ग्रामपंचायत समितीस हे मान्य नसल्याचे समजते.प्रस्तावामध्ये शब्दरचना बदललीग्रामपंचायतने २४ जानेवारी २०११ च्या मासिक सभेमध्ये ठराव क्रमांक ११/२ नुसार सभागृह मिळण्याबाबद चर्चा करण्यात येऊन ग्राम सचिवालयाचे बाजूने परमात्मा एक सेवक मंडळ प्रार्थनास्थळी (अतिक्रमण करण्यात आलेल्या सरकारी जागेवर) आमदार महोदयाच्या स्थानिक विकास निधीतून सभागृह बांधण्यात यावे असे ठरले होते.तसा प्रस्ताव आमदार यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यांच्या शिफारसीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावासह अंदाजपत्रक जिल्हा नियोजन समितीकडे सादर केले. प्रस्तावात चर्चास्थळाऐवजी मानव मंदिराजवळ असा शब्दप्रयोग करण्यात आला. त्यामुळे सभागृह नेमके कुठे बांधणार याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.