भरवस्तीत शिरून रानडुकराचा बालकावर हल्ला; लाखांदूर तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 16:11 IST2022-02-08T12:51:45+5:302022-02-08T16:11:51+5:30
मंगळवारी सकाळी रानडुकरांच्या कळपाने भरवस्तीत प्रवेश केला. त्यावेळी घराकडे जात असलेल्या मनीषवर रानडुकरांनी हल्ला केला.

भरवस्तीत शिरून रानडुकराचा बालकावर हल्ला; लाखांदूर तालुक्यातील घटना
लाखांदूर (भंडारा) : रानडुकरांनी कळपाने भरवस्तीत शिररून एका बालकावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास तालुक्यातील सरांडी बु येथे घडली. उपचारासाठी गावातील प्राथमिक ओराग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
मनीष विठ्ठल मखरे (१४) रा. सरांडी बुज. ता. लाखांदूर असे जखमी मुलाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी रानडुकरांच्या कळपाने भरवस्तीत प्रवेश केला. त्यावेळी घराकडे जात असलेल्या मनीषवर रानडुकरांनी हल्ला केला. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच आरडाओरड करून रानडुकरांना हाकलून लावले.
या हल्ल्यात मनीषच्या पायाला गंभीर स्वारूपाची दुखापत झाली. त्याला उपचारासाठी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती स्थानिक लाखांदूर वनविभागाला देण्यात आली आहे.