बायको नोकरीला अन् नवरा घर सांभाळायला
By Admin | Updated: May 15, 2014 23:18 IST2014-05-15T23:18:16+5:302014-05-15T23:18:16+5:30
बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चार चौघीत उठून दिसावी अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. या सोबतच तिने गृहकृत्यदक्ष आणि आदर्श सून म्हणूनही

बायको नोकरीला अन् नवरा घर सांभाळायला
भंडारा : बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चार चौघीत उठून दिसावी अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. या सोबतच तिने गृहकृत्यदक्ष आणि आदर्श सून म्हणूनही महत्वाची भूमिका पार पाडली पाहिजे. परंतु नोकरी करुन अर्थार्जन मिळविणारी बायको आता नवरोबांसाठी डोकेदुखी ठरु लागली आहे. शहरात हाऊसवाईफ नव्हे तर हाऊस हसबंडचे प्रमाण वाढल्याने नवरा-बायकोच्या नात्यात कटुता निर्माण होत आहे. अर्थात यात सामंजस्यपणाचा अभाव असल्याचे जाणवते. पूर्वी गृहिणींचे स्थान चुल आणि मूल एवढ्यावरच र्मयादित होते. आता मात्र या गृहिणींचे स्वरुप बदलत आहे. अनेके घरांमध्ये नवरोबांवर चुल आणि मूल सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. मात्र अशातही बायकोची नोकरी आणि कुटुंब अशा दोन्ही पातळ्यांवर लढा देत असल्याने कुटुंबांमध्ये काही प्रमाणात समतोल राहत आहे.एकाच वेळी आपल्या कामाच्या वेळी मुलांचा सांभाळायचं की कुटुंबाकडे लक्ष पुरवायचे तसेच एकमेकांना समजून घ्यायचे यावर दोघांची कसरत होत आहे. परंतु काही नवरोबांचा यामुळे इगो दुखावत असल्याने त्यांच्या नात्यात दरार निर्माण होत आहे. (शहर प्रतिनिधी)