पत्नीच निघाली मुख्य सूत्रधार

By Admin | Updated: December 8, 2014 22:30 IST2014-12-08T22:30:20+5:302014-12-08T22:30:20+5:30

तालुक्यातील खुटसावरी येथील एका शेतशिवारात असलेल्या माता मंदिरात सुरेंद्र धांडे या इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात आढळला होता. ही घटना काल रविवारी (दि.७) रोजी सकाळी उघडकीला आली होती.

The wife of the main founder | पत्नीच निघाली मुख्य सूत्रधार

पत्नीच निघाली मुख्य सूत्रधार

खुटसावरी हत्याकांड : पोलिसांनी २४ तासात लावला आरोपींचा छडा, आज करणार न्यायालयात हजर
मोहाडी : तालुक्यातील खुटसावरी येथील एका शेतशिवारात असलेल्या माता मंदिरात सुरेंद्र धांडे या इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात आढळला होता. ही घटना काल रविवारी (दि.७) रोजी सकाळी उघडकीला आली होती. पोलीसांनी तपासाची चक्रे फिवूरून मृतकाच्या पत्नीसह पाच जणांना अटक केली आहे. यात पत्नीनेच आपल्या पतीची हत्या करण्याचे कटकारस्थान रचले.
याबाबत असे की, मोहाडीच्या पश्चिमेला आठ कि.मी. अंतरावर खुटसावरी हे लहानशे गाव आहे. तेथील सुरेंद्र वासुदेव धांडे या इसमाची माता मंदिरात निर्घृण खून करण्यात आला. मृतदेहाजवळ कुंकु, अक्षता, भात व नारळ ठेवलेले घटनास्थळावर आढळून आल्यामुळे व घटना पौर्णिमेच्या रात्री घडल्याने प्रथमदर्शनी शंकाकुशकांना पेव फुटले होते. परंतु, त्याचवेळी या घटनेमागील वास्तव वेगळेच असल्याची चर्चा घटनास्थळावर होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची वेगवान चक्रे फिरविली. यात गावातून गुप्त माहितीच्या आधारे पुढील कारवाईला सुरूवात केली. तसेच मृत सुरेंद्रच्या गळ्यावर आणि छातीवर धारदार शस्त्राचे व्रण आढळले. गंभीर जखमांमुळे सुरेंद्रचा मृत्यृ झाला.
अशी आहे घटना
शनिवारी (दि.६) सुरेंद्रने शेतावर धानाची मळणी केली. मळणीनंतर धान शेतातच ठेवले होते. रात्री जेवण आटोपल्यानंतर धानाचे पोते सुरक्षित आहेत का? हे बघण्यासाठी सुरेंद्र रात्री दहा वाजता शेतावर गेला. गावापासून शेत अर्धा कि.मी. अंतरावर आहे. धानाचे पोते बघण्यासाठी गेलेला सुरेंद्र घरी परतलाच नाही. जावई घरी कां परतले नाही हे बघण्यासाठी सुरेंद्रचा साळा ईश्वर मते हा शेताकडे गेला.
ईश्वरने त्या परिसरात शोध घेतला. मात्र त्याला तो सापडला नाही. त्यानंतर दुसऱ्या शेतावर शोध घेतला असता शेतावरच गावचे श्रध्दास्थान असलेल्या माता मंदिर आहे. त्या मंदिराच्या गाभाऱ्यात रक्ताच्या थारोळ्यात सुरेंद्रचा मृतदेह पडून होता. सुर्योदयापूर्वीच या घटनेचे वार्ता गावपरिसरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती पोलिस पाटील सीमा बिसने यांनी मोहाडी पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. मृत सुरेंद्रला दोन भाऊ असून एक नागपुरात तर दुसरा गावातच वेगळा राहतो. सुरेंद्रचा साळा ईश्वर मते हा काही दिवसांपासून त्यांच्याकडेच राहत आहे.
मृत सुरेंद्रला तीन वर्षाची मुलगी आहे. सुरेंद्रकडे तीन एकर शेती आहे. घटनास्थळावर जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, मोहाडीचे पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, उपनिरीक्षक एस.बी. चौधरी यांच्यासह पोलिसांचा ताफा होता. (तालुका / शहर प्रतिनिधी)
पत्नीनेच रचला होता कट -पोलीस अधीक्षक कणसे
सुरेंद्र धांडे याची हत्या ही अनैतिक संबंधाच्या कारणावरून करण्यात आली. सुरेंद्रची पत्नी व अन्य चार जणांनी सुरेंद्रच्या हत्येला अंतिम रूप दिले. पत्नीच्या सांगण्यावरून घटनास्थळी सर्व तयारी करण्यात आली होती. सुरेंद्रची हत्या झाल्यावर आपल्यावर कुणी संशय घेणार नाही याचीही खबरदारी थोड्या फार प्रमाणात घेण्यात आली होती. महिलेच्या व अन्य एका युवतीचा सहभाग अनैतिक संबंधात असल्याने सुरेंद्र हा त्यांच्या मधात फार मोठा अडथळा होता. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पत्नीला आधी ताब्यात घेतले व त्यानंतर विविध गावातून अन्य चार जणांना ताब्यात घेण्यात आले. धारदार चाकूने सुरेंद्रची हत्या करण्यात आली. घटनास्थळी आढळलेला इंजेक्शनचा या घटनेशी कुठलाही संबंध नसल्याचे व सुरेंद्रची हत्या अनैतिक संबंधातूनच झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी पत्रपरिषदेत दिली.

Web Title: The wife of the main founder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.