शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कोण जिंकले, कोण हरले? आमचे दिवस सारखेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 13:19 IST

Bhandara : मतदानासाठी कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा, आम्हाला काय फायदा?

विलास खोब्रागडे लोकमत न्यूज नेटवर्क सिल्ली: जिल्ह्यात येत्या दि. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान असल्याने प्रत्येक मतदाराला निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावताना अडथळा येऊ नये. यासाठी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्यांना या दिवसाचा पूर्ण पगार मिळणार आहे. मात्र शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी अकुशल कामगार यांनी मतदानासाठी सुट्टी घेतल्यास पूर्ण दिवसाची मजुरी मिळणार नाही. निवडणुकीत कोण जिंकले, कोण हारले? आमचे सर्व दिवस सारखेच असल्याची शेतकरी तसेच इतर मजूरवर्गाची प्रतिक्रिया आहे.

देशाच्या लोकशाहीत मतदानाला फार महत्त्व आहे. १८ वर्षांवरील सर्व मतदारांनी मतदान करणे आवश्यक असून, मतदानाचा दिवशी सरकारी कर्मचारी यांना भरपगारी सुट्टी देण्यात आली. तसेच उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या प्रत्येक उपक्रम व आस्थापनेला पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास मतदानासाठी संबंधित जिल्हाधिकारी / जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी दोन तासांची सवलत मिळणार असून, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी मीडवीक ऑफ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचा पगार न कापता मतदानाचा हक्क बजावता येणार आहे

मात्र देशाच्या पोशिंदा असलेले शेतकरी, शेतमजूर, रोजंदारीवर काम करणारे मजूर, अकुशल कामगार, कारागीर, कंत्राटी मानधनावर काम करणारे असंघटित रोजंदार, हातावर पोट असलेले कष्टकरी यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे कामावर न जाता मतदानासाठी एक दिवसाची पूर्ण रोजंदारीची मजुरी मिळेल काय? एक दिवस कामावर न गेल्यास संध्याकाळची चूल पेटणार की अशी गरीब जनतेची अवस्था आहे. त्यामुळे निवडणुकीच्या सार्वजनिक सुट्टीचा आम्हाला काय फायदा? असा कष्टकरी जनतेचा सवाल आहे. दरम्यान निवडणुकीनंतर कष्टकरी व गरजुंना त्यांच्या समस्यांवर विचार करणारे सरकार हवे आहे. वारंवार निवडणुकीत आम्ही मतदान करतो परंतु गंभीरपणे विचार केला जात नाही. 

"निवडणूक झाल्यावर लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी यांचा विचार होतो. मात्र सरकार निवडून देणाऱ्या सामान्य जनतेच्या आयुष्य म्हणजे मातीत जगणे अन् मातीतच मरण्यासारखे आहे."- सोमेश्वर राघोर्ते, अर्जुनी

"निवडणुकीपूर्वी ३०० ते ३५० रुपये रोजी मिळते आणि मतदान झाल्यावरही तेवढीच मिळेल. त्यामुळे कोण जिंकले, कोण हारले? आमच्या कामात किवा रोजीत  कोणताच बदल होत नाही." - संतोष रामटेके, बोरगाव

टॅग्स :bhandara-acभंडाराmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Farmerशेतकरी