शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

‘तो’ सेटिंगबाज कर्मचारी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:37 PM

ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत विविध विभागांची कार्यालय आहेत.

ठळक मुद्देविभाग प्रमुखाकडून आणल्या फाईल्स : लाभार्थ्यांना फोन करून मागतोय रक्कम

प्रशांत देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत विविध विभागांची कार्यालय आहेत. येथील एका विभागात कार्यरत एका कर्मचाºयाने त्याच्या विभाग प्रमुखाची मर्जी सांभाळून त्रृटी पूर्ण झालेल्या फाईल्स स्वत:कडे घेवून लाभार्थी कर्मचाºयांना फोन करून पैशाची मागणी करीत आहे. जिल्हा परिषदमधील एका विभागात कार्यरत या कर्मचाºयाच्या उपदव्यापामुळे अनेक अधिनस्थ कर्मचारी कर्मचारी त्रस्त झाले असून ‘तो’ कर्मचारी कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.जिल्हा परिषदच्या इमारतीत आरोग्य, कृषी, समाजकल्याण, लघु पाटबंधारे विभाग, बांधकाम, शिक्षण, वित्त, पशुसंवर्धन यासह अनेक महत्वाची विभाग आहेत. यातीलच नागरिकांच्या अत्यंत निगडीत असलेल्या एका विभागात मागील काही दिवसांपासून येथीलच एक कर्मचारी दिवसाढवळ्या एकप्रकारे 'लुट' करीत आहे. येथील विभागप्रमुख नव्यानेच रूजू झाले असून या कर्मचाºयाने आपल्या वरिष्ठाची मर्जी सांभाळल्याचे यावरून दिसून येते.सदर कनिष्ठ कर्मचाºयाकडे नव्यानेच नवीन धुरा सोपविण्यात आली आहे. पुर्वीच्या कर्मचाऱ्याने आपले कर्तव्यपालन करताना त्यांच्या अधिनस्त कर्मचाºयांच्या शासकीय देयकांच्या फाईल्समधील त्रृट्या पुर्ण करून त्या विभागप्रमुखाकडे सादर केल्या होत्या.सदर विभाग प्रमुखाच्या स्वाक्षरीनंतर त्या फाईल्स थेट मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे अंतिम देयके कर्मचाºयांना देण्यासंदर्भात पाठविण्यात येणार होत्या. मात्र सदर कनिष्ठ कर्मचाºयाने त्याच्याकडे प्रभार येताच त्याच्या विभाग प्रमुखाकडील अनेक फाईल्स स्वत:च्या ताब्यात घेतल्या. या फाईल्स ज्या कर्मचाºयांच्या आहेत त्यांना या कनिष्ठ कर्मचाºयाने स्वत:च्याच भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा सपाटा सुरू केला. यात सदर कर्मचारी लाभार्थ्यी कर्मचाऱ्यांकडून थेट पैशाची मागणी करीत आहे. सदर कर्मचारी हा पूर्णवेळ कर्मचारी असला तरी अनेकदा हा बाहेरील चहा-टपरी किंवा जिल्हा परिषदेच्या परिसरात मोबाईलवरूनच अनेकदा बोलताना दिसून येतो.यावरूनच या कर्मचाऱ्याबाबत त्याच्या अधिनस्त कर्मचाºयांमध्ये असंतोष पसरलेला आहे. केवळ पैशाच्या मागणीपोटी हा कर्मचारी अनेकांना त्रस्त करीत आहे. पैसे दिल्यास हातोहात फाईल क्लिअर करा, असा संदेश तो निर्ढावपणे सांगत आहे. त्यामुळे या भ्रष्टाचारी कर्मचाºयासह त्याचे विभाग प्रमुखही या प्रकरणात गुंतले असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ‘तो’ कर्मचारी कोण असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनातील कर्मचारी एकमेकांना विचारताना दिसत आहे.