पांढऱ्या कांद्यापासून भुकटी!

By Admin | Updated: June 19, 2014 23:39 IST2014-06-19T23:39:46+5:302014-06-19T23:39:46+5:30

गहू, तांदूळ व डाळ जास्त काळ सुरक्षित राहावे यासाठी रोजच्या वापरातील पांढऱ्या कांद्याची भुकटी तयार करण्यात येते. त्यासाठी हा कांदा बाजारातून कारखान्यात नेला जात आहे. भुकटीच्या या गोरखधंद्यामुळे

White onion powder! | पांढऱ्या कांद्यापासून भुकटी!

पांढऱ्या कांद्यापासून भुकटी!

धान्य सुरक्षिततेसाठी उपयोग : पांढरा कांदा बाजारात अत्यल्प
तुमसर : गहू, तांदूळ व डाळ जास्त काळ सुरक्षित राहावे यासाठी रोजच्या वापरातील पांढऱ्या कांद्याची भुकटी तयार करण्यात येते. त्यासाठी हा कांदा बाजारातून कारखान्यात नेला जात आहे. भुकटीच्या या गोरखधंद्यामुळे बाजारातून पांढरा कांदा गायब झाला आहे. ४० किलोच्या पोत्याचे दर ७०० ते ७५० इतके वाढले आहे.
उन्हाळ्यात पांढऱ्या कांद्याची बाजारात मोठी आवक असते. मागील पाच वर्षाचा अनुभव लक्षात घेता पावसाळ्याच्या दिवसात कांदा सर्वसामान्यांना रडवतो. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंब कांद्याची साठवणूक करून ठेवतात. पांढऱ्या कांद्याला बाजारात मोठी मागणी असते. मे महिन्याच्या सुरूवातीला बाजारात पांढऱ्या कांद्याचा दर प्रतिकिलो १० रूपये इतका होता. ४० किलोग्रॅमचा कट्टा ४०० रूपयाला मिळत होता. सध्या या कटट्याची किंमत ७०० ते ७५० इतकी झाली असून जून महिन्याचा अखेरीस पांढरा कांदा बाजारातून हद्दपार झाला आहे.
पांढऱ्या कांद्यापासून भुकटी
पावसाळ्यात मध्यमवर्गीय कुटुंब अन्नधान्याची साठवणूक करून ठेवतात. यात तांदूळ, गहू, डाळी व अन्य कडधान्यांचा समावेश असतो. पांढऱ्या कांद्यापासून तयार होणारी भुकटी धान्यात मिसळविल्याने अळ्या पडत नाही. परिणामी धान्य बरेच दिवस सुरक्षितरित्या टिकवून ठेवता येते. कांद्याची ही भुकटी पांढरी असल्यामुळे धान्य व कडधान्याचा रंगसुद्धा बदलत नाही. कांद्याचा दर्प उग्र असल्यामुळे या किटकापासून धान्याचा बचाव होतो. त्यामुळे पांढऱ्या कांद्याला या भुकटीच्या कारखान्यात मागणी असते. लाल कांद्याच्या भुकटीचा रंग लाल असल्यामुळे ही भुकटी घेण्याचे टाळतात.
काय आहे नियम
कांदा हा नियमित उपयोगात आणला जातो. खाद्य पदार्थाचा असा दुरूपयोग करण्यासाठी कायद्याने मनाई आहे. ठोक बाजारातून सध्या पांढरा कांदा कारखान्याकडे जात असताना आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पांढऱ्या कांद्याचे भाव वधारणे व कांद्याच्या टंचाईची कारणे विचारली असता ही धक्कादायक माहिती मिळाली.
या संदर्भात डॉ.मधुकर लंजे यांचेशी चर्चा केली असता ते म्हणाले कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात अमोनियम हा वायू असतो. त्याला उग्र दर्प असतो. त्या दर्पामुळे किटक जवळ येत नाहीत. धान्याला कीड लागू नये याकरिता या भुकटीचा वापर केला जातो. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: White onion powder!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.