सकाळी सोन्याचांदीचे दुकान उघडत असतानाच चोरट्यांनी मारला डल्ला.. ७० लाखांचे दागिने पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 14:02 IST2021-08-16T14:01:45+5:302021-08-16T14:02:17+5:30
Bhandara News सराफा दुकान उघडत असतानाच दोन अज्ञात इसमांनी ७० लाख रुपये किंमतीचे दागिने असलेली बॅग दुकानासमोरून उचलून पोबारा केल्याची घटना भंडारा येथे सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.

सकाळी सोन्याचांदीचे दुकान उघडत असतानाच चोरट्यांनी मारला डल्ला.. ७० लाखांचे दागिने पळवले
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: सराफा दुकान उघडत असतानाच दोन अज्ञात इसमांनी ७० लाख रुपये किंमतीचे दागिने असलेली बॅग दुकानासमोरून उचलून पोबारा केल्याची घटना येथे सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.
ठाणा पेट्रोल पंपाजवळच्या टी पॉईंट येथे असलेल्या स्वाती ज्वेलर्समध्ये ही घटना घडली. दुकानाचे मालक सोमवारी सकाळी दुकान उघडताना त्यांनी सोन्या-चांदीच्या ऐवजाने भरलेली बॅग बाजूला ठेवली होती. ते शटर उघडण्याच्या कामात गुंतले असल्याचे पाहून दोन चोरांनी त्यांची बॅग उचलून दुचाकीने नागपूरच्या दिशेने पळ काढला.