भंडारा पॉलिबॅगमुक्त कधी होणार ?

By Admin | Updated: September 1, 2015 00:33 IST2015-09-01T00:33:02+5:302015-09-01T00:33:02+5:30

देशातील बहुतांश राज्यांमध्ये पॉलिथिन बॅगवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.

When will Bhandara polybag be free? | भंडारा पॉलिबॅगमुक्त कधी होणार ?

भंडारा पॉलिबॅगमुक्त कधी होणार ?

नियमांची ऐसीतैसी : ५0 मायक्रॉन पॉलिथिन सहजपणे उपलब्ध
भंडारा : देशातील बहुतांश राज्यांमध्ये पॉलिथिन बॅगवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर भंडारासुद्धा पॉलिबॅग मुक्त व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे.
राज्य सरकारने २००६ मध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिथिन बॅगची निर्मिती, विक्री आणि उपयोगावर प्रतिबंध लावण्याचा नियम लागू केला. त्याची अंमलबजावणीही झाली.
६० टक्क्यांपेक्षा जास्त व्यावसायिक ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिथिन बॅगमध्ये ग्राहकांना वस्तू देत असल्याचे बाजारात चित्र आहे. राज्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिबॅग निर्मितीवर प्रतिबंध असतानाही बाजारात एवढ्या मोठ्या प्रमाणात बॅग कुठून येतात, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
याबाबत चौकशी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. तसेच कायद्याचे उल्लंघण करणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. (प्रतिनिधी)

पॉलिथिन खाल्ल्याने जनावरांचा मृत्यू
प्रदूषण नियंत्रणावर काम करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर संस्थेचे अभियान सुरू आहे. कमी जाडीचे पॉलिबॅग खाल्ल्यानंतर जनावरांमध्ये विशेषत: गायी मृत्युमुखी पडतात. पॉलिथिनमुळे नाल्या तुंबल्यानंतर मुंबईत पूर आला होता. शहरात मोठी दुकाने वगळता सुमारे ६० टक्के छोटे दुकानदार व हातठेल्यांवर आतासुद्धा ५० मायक्रॉनपेक्षा कमी वजनाच्या प्लॅस्टिक बॅगचा वापर धडाक्यात सुरू आहे. अशा विक्रेत्यांवर प्रतिबंध लावण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

लेह लडाखपासून धडा घ्यावा
लेह लडाख दीड दशकाआधीच पॉलिथिन बॅगमुक्त झाला आहे. तेथील लोक नमूद केलेल्या जागेवरच बॅग फेकतात.बॅगचा साठा लेह व लडाखच्या बाहेर नेला जातो. त्यांच्यापासून धडा घेण्याची गरज आहे.

नाल्याचा प्रवाह प्रभावित
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिबॅगचे पुनर्चक्रण होऊ शकत नाही. या बॅग नदी, तलाव, नाल्यांमध्ये फेकल्यामुळे पाणी प्रदूषित होते. नाल्याचा प्रवाह प्रभावित होतो. अशा स्थितीत नागरिकांनी कमी जाडीच्या बॅगचा उपयोग करू नये. त्याची योग्य विल्हेवाट लावावी. कापडी थैल्यांचा अधिकाधिक उपयोग करावा.

प्रदूषणमुक्त होण्यात सहभागी व्हा
पॉलिथिन बॅगचा तुम्ही उपयोग करीत असल्यास प्रदूषण वाढविण्यात तुमचाही तेवढाच सहभाग आहे. नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा जाड पॉलिबॅगचा उपयोग करा. खरेदीसाठी कापडाची थैली सोबत न्यावी. प्रदूषणमुक्त शहर बनविण्यात तुम्हीसुद्धा सहभागी होऊ शकता.

Web Title: When will Bhandara polybag be free?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.