शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

काय वाट्टेल ते! मुलापेक्षा आईचे वय पाचच महिन्याने अधिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 10:33 AM

श्रावण बाळ निवृत्ती योजनेचा लाभ उचलण्यासाठी एकाच परिवारातील तीन सदस्यांनी जन्मतारखेत फेर बदल करून हा प्रताप घडवून आणला आहे.

ठळक मुद्देमोहाडीत बोगस प्रमाणपत्र बनविणारी टोळी सक्रीय

सिराज शेख।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शीर्षक वाचून दचकलात ना ! हे कसे शक्य आहे म्हणून विश्वास बसणार नाही. आपल्या मुलापेक्षा आई कमीतकमी २० वर्षे तर वडील २१ वर्षे तरी मोठे राहणारच. पण आजच्या युगात असेही होऊ शकते हे एका प्रकरणावरून लक्षात आले आहे. आईच्या आणि त्यांच्या मुलाच्या जन्म तारखेत फक्त पाच महिन्याचा अंतर आहे. श्रावण बाळ निवृत्ती योजनेचा लाभ उचलण्यासाठी एकाच परिवारातील तीन सदस्यांनी जन्मतारखेत फेर बदल करून हा प्रताप घडवून आणला आहे.

सदर प्रतिनिधीने हे प्रकरण हुडकून काढले असता आणि त्यांचे कागदपत्रे अधिकाऱ्यांनी बघितली असता त्यांचेही डोके चक्रावले. पैशासाठी लोक कोणत्या थराला जातील याचा आज नेम नाही.श्रावण बाळ वृद्धापकाळ निराधार योजनेचा हजार रुपये महिना प्राप्त करण्यासाठी ३५ ते ४५ वर्षाचे नागरिक आधार कार्डातील मूळ जन्मतारखेत फेरबदल करून तसेच तलाठी अहवाल व वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस तयार करून याचा लाभ उचलत आहेत. मोहाडी तालुक्यात असे हजारो प्रकरणे आहेत ज्यात पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळत आहे. परंतु ताडगाव येथील एका परिवाराने तर कहरच केला. त्यांनी पती-पत्नी दोघांचे तर अर्ज सादर केलेच केले परंतु आपल्या मुलाचाही अर्ज सादर केला.

जर मुलगा ६७ वर्षाचा आहे, तर आई-वडील जवळपास ९२ वर्षाचे असायला हवे होते, परंतु अर्ज करणारे दोघेही ही ५०-५५ वर्षाच्या जवळपास आहेत. शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार असतात. मागील पाच वर्षाच्या कालावधीत या प्रकारचे हजारो बोगस प्रकरणे मंजूर करण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून ३० वर्षा पासून ते ४५ वर्षापर्यंतचे असलेले आपण ६६ वर्षाचे असल्याचे भासवून योजनेचा लाभ घेत आहेत.बनावटी आधार कार्डअर्जातील आधार कार्डनुसार पतीची जन्मतारीख २५ जून १९५४, पत्नीची जन्मतारीख एक जानेवारी १९५३, तर मुलाची जन्मतारीख ११ जून १९५३ आहे. या जन्म तारखेप्रमाणे आई ६७ वर्षाची, वडील ६६ वर्षाचे, तर मुलगा ६७ वर्षाचा आहे. म्हणजे पत्नीपेक्षा पती एक वर्षाने लहान तर मुलगा बाप पेक्षा एक वर्षाने मोठा आणि आईपेक्षा फक्त पाच महिन्याने लहान आहे. आधार कार्डातील मूळ जन्मतारखेत फेरबदल करून खोटी जन्मतारीख घालतांना त्यांना एवढेही भान राहिले नाही की आई-वडील व मुलाच्या जन्मतारखेत काहीतरी अंतर ठेवायला हवे. यातच ते फसले. तेथीलच एका राशन दुकानदाराने सुद्धा आपण व पत्नी निराधार असल्याचा अर्ज केला आहे. बोगस आधार कार्ड, वैद्यकीय दाखले, तलाठी अहवाल बनविणारी टोळी तालुक्यात सक्रीय असल्याची माहिती आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी