अभिनेता असरानीचे पवनी नगरीत स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:26 IST2019-03-04T22:26:22+5:302019-03-04T22:26:42+5:30

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असरानी यांचे जिल्हयात आगमण होवून ते लाखांदूरच्या कार्यक्रमाला जात असताना पवनी येथील जवाहर गेट चौकात मोठ्या संख्येत जमलेल्या चाहत्यांनी असरानी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

Welcome to Actor Asrani Pavni Nagar | अभिनेता असरानीचे पवनी नगरीत स्वागत

अभिनेता असरानीचे पवनी नगरीत स्वागत

ठळक मुद्देजल्लोष : शोले चित्रपटातील डायलॉगला चाहत्यांकडून दाद

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असरानी यांचे जिल्हयात आगमण होवून ते लाखांदूरच्या कार्यक्रमाला जात असताना पवनी येथील जवाहर गेट चौकात मोठ्या संख्येत जमलेल्या चाहत्यांनी असरानी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
जवाहर गेट चौकात असरानी यांचे आगमन होताच त्यांनी गाडीखाली उतरुन त्यांनी चाहत्यांच्या स्वागताचा स्विकार केला यावेळी त्यांच्यासोबत जि. प. अध्यक्ष रमेश डोंगरे हे उपस्थित होते. यावेळी असरानी यांना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येत चाहत्यांनी गर्दी केली होती चाहत्यांच्या आग्रहास्तव शोले चित्रपटातील ‘हम अंग्रेज के जमाने के जेलर है’ हा डायलॉग बोलून दाखवताच चाहत्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली याप्रसंगी शंकर तेलमासरे, लोमेश वैद्य, मनोहर मेश्राम ,सुनिल उपरिकर ,जीवन गाटेफोडे, दिपक भांडारकर, संगिता मेश्राम, सुरेखा जनबंधू ,आशिष ब्राम्हणकर ,प्यारेलाल तलमले, चंदू मेश्राम, मोरेश्वर वाकडीकर, विरेंद्र तेलमासरे, जीवन मेश्राम शालीक अवसरे, मंगेश भोगे, नवाब अली ,नारायण कुर्वे, भगवान गुरतुले, दिनेश ब्रम्हे, लक्ष्मीकांत तागडे, रामकृष्ण अवसरे आदिंनी असरानी यांचे स्वागत केल.

Web Title: Welcome to Actor Asrani Pavni Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.