विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
By Admin | Updated: March 20, 2016 00:46 IST2016-03-20T00:46:10+5:302016-03-20T00:46:10+5:30
जिल्हा परिषद क्षेत्रातील मतदारांनी मतपेटीतून जो विश्वास टाकला त्याला तडा जाऊ देणार नाही.

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
चित्रा सावरबांधे यांचे प्रतिपादन : विकास कामांचे भूमिपूजन
आसगाव : जिल्हा परिषद क्षेत्रातील मतदारांनी मतपेटीतून जो विश्वास टाकला त्याला तडा जाऊ देणार नाही. क्षेत्राच्या विकासासाठी अहोरात्र झटून क्षेत्राचे नंदनवन करेल असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य चित्रा सावरबांधे यांनी केले.
आसगाव जिल्हा परिषद क्षेत्रात ८२ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती नीळकंठ टेकाम, माणिक ब्राह्मणकर, सभापती अर्चना वैद्य, मंगेश ब्राह्मणकर, युवराज वासनिक, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय सावरबांधे, मनोहर महावाडे, अशोक मोहरकर, बंडू ढेंगरे, निलेश सावरबांधे, पुंडलिक हत्तीमारे, प्राचार्य बी.बी. बावणे उपस्थित होते. जिल्हा परिषद हायस्कूल येथे १५ लक्ष रुपयांच्या शौचालय बांधकाम व विठ्ठल रुखमाई मंदिर सीमेंट रस्ता बांधकामाचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले. संचालन प्रा.नरेश मोटघरे यांनी तर आभारप्रदर्शन गजानन भरणे यांनी केले. (वार्ताहर)