शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या प्रमाणपत्रासाठी मोहीम राबविणार

By admin | Updated: September 8, 2016 00:35 IST

दिव्यांगांसाठी शासनाची पेन्शन योजना असून या योजनेत लाभार्थी निवडीसाठी अपंगत्वाच्या तसेच वयाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते.

जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी : आढावा बैठकीत निर्देश, तालुकास्तरावर घेणार आरोग्य तपासणी मेळावा भंडारा : दिव्यांगांसाठी शासनाची पेन्शन योजना असून या योजनेत लाभार्थी निवडीसाठी अपंगत्वाच्या तसेच वयाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना प्रमाणपत्र प्राप्त व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासन विशेष मोहिम राबविणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. अहिरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके उपस्थित होते.प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य तपासणी मेळावा घेण्याचे प्रस्तावित असून यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करुन तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. शासनाच्या विविध योजनाचा लाभ दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिम राबविण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले असून या मोहिमेत आरोग्य विभागाच्या सर्व डॉक्टर्सनी सहभागी होणे बंधनकारक असणार आहे. या मोहिमेची तारीख लवकरच ठरविण्यात येणार असून दिव्यांगांना वयाचा दाखला देण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी यांची असणार आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.महसूल विभागाच्या वतीने प्रत्येक तालुक्याला मंडळ मुख्यालयी समाधान शिबीर घेण्यात येतात. या शिबीराला जोडून आरोग्य विभागाने आरोग्य मेळावे घेऊन सामान्य मानसाला आरोग्य सुविधा पुरवाव्या असे त्यांनी सांगितले. संस्थात्मक प्रसूतीचे उद्दिष्टपूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. अवयवदान ही सामाजिक चळवळ म्हणून राबवावी असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, अवयवदानासाठी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी.या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, जिल्हा एड्स नियंत्रण समिती, किटकजन्य साथ, जलजन्य साथ, हिवताप, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन इत्यादी आरोग्य विषयक विषयांचा आढावा घेतला. (नगर प्रतिनिधी)