वनउपजावर प्रक्रिया करणारी संशोधन समिती नेमणार
By Admin | Updated: October 31, 2015 01:33 IST2015-10-31T01:33:29+5:302015-10-31T01:33:29+5:30
विदर्भ हा निसर्गाने व तलावाने नटलेला आहे. त्यामुळे विदर्भात वनउपज तलाव, खनिज संपत्ती विपूल प्रमाणात उपलब्ध आहे. ही बाब मुख्यमंत्री,

वनउपजावर प्रक्रिया करणारी संशोधन समिती नेमणार
नाना पटोले : अहवाल येताच काम सुरू
भंडारा : विदर्भ हा निसर्गाने व तलावाने नटलेला आहे. त्यामुळे विदर्भात वनउपज तलाव, खनिज संपत्ती विपूल प्रमाणात उपलब्ध आहे. ही बाब मुख्यमंत्री, वनमंत्री व महसूल मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर वनसचिवांची त्रिसदस्यीय समिती नेमणार असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत खासदार पटोले यांनी भंडारा, गोंदिया जिल्ह्याबाबत विविध विषयावर चर्चा केली. वनउपजावर प्रक्रिया करणारे प्रकल्प दोन्ही जिल्ह्यात आणून रोजगार उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे. त्यामुळे ग्रामीण युवकांना रोजगाराची दालने उभारणे हाच हेतु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
समितीच्या अहवालानंतर मोहफुलापासून कॅन्डी, शरबत, सायरप आदी प्रक्रिया करणारे प्रकल्प खादी ग्रामाद्योग अथवा नाबार्डकडून आणून ही जिल्हा सुजलाम सुफलाम बनविण्याचा विशेष प्रयत्न राहणार आहे. वेळप्रसंगी सीएसआर फंडातून निर्मिती करण्याचा माणस खा. पटोले यांनी व्यक्त केला आहे. मोहाची टोळ व करंजीची बियापासून अखाद्य बायोडिझल तयार करण्यासाठी विशेष भर दिला जाईल.
आमदार असताना शेतीवर आधारित उद्योग आणण्यासाठी कधीही विरोध नव्हता, पुढेही राहणार नाही. महिलासाठी क्रॉफ्ट झिडाइन हस्तबांबु वर कामकरण्यासाठी प्रकल्प आणण्याचा जोरात सुरू असून राजस्थान जयपूर येथून प्रशिक्षणासाठी तंज्ञाना बोलवून प्रशिक्षण देवून त्यांच्या कारागिरीला वाव देण्याचा प्रयत्न सुरू आहे. वनउपजावर अजुन काय काय प्रकल्प आणू शकतो हे प्रयत्न आहेत. (नगर प्रतिनिधी)