यांत्रिकी युगात घोडाबाजार लुप्त होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:05 IST2019-01-18T01:05:28+5:302019-01-18T01:05:50+5:30
दुर्गाबाई डोह यात्रेवर यावर्षी घोडाबाजार भरलाच नाही. या यांत्रिकी युगामध्ये येथील घोडाबाजार लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. दुर्गाबाई डोह यात्रेवर यापुर्वी बालाघाट, शिवनी, अकोला, अमरावती व इतर ठिकाणाहून येथे घोडे खरेदी-विक्री करिता येत होते.

यांत्रिकी युगात घोडाबाजार लुप्त होण्याच्या मार्गावर
शिवशंकर बावनकुळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : दुर्गाबाई डोह यात्रेवर यावर्षी घोडाबाजार भरलाच नाही. या यांत्रिकी युगामध्ये येथील घोडाबाजार लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
दुर्गाबाई डोह यात्रेवर यापुर्वी बालाघाट, शिवनी, अकोला, अमरावती व इतर ठिकाणाहून येथे घोडे खरेदी-विक्री करिता येत होते. पन्नास-साठ वर्षापूर्वी दळणवळणाची साधने अपुरी होते. त्यावेळेस पाटील, मालगुजार व संपन्न लोक साधन व शौक म्हणून घरी घोडे ठेवत होते. घोड्याच्या देखभालीकरिता मजुरी सुद्धा मिळत होती. या यांत्रिकी युगामध्ये आवागमनची साधने खेड्यापासून ते तालुका मुख्यालयापर्यंत झाली आहेत. घोडे सुद्धा मोटरसायकल ते कारच्या किंमती पर्यंत पोहचली आहेत. जेवढा घोडा किंमती त्याप्रमाणात देखभाल करावी लागते. सध्या गावात मजुर मिळत नाही. घोड्याचा देखभाल करण्याचा खर्च सुद्धा परवडणारा नाही. यामध्ये दैनंदिन खुराग, गवत दररोज धुणे हे सुद्धा सर्व खर्चिक झालेले आहे.
दुर्गाबाई डोह यात्रा विदर्भ, छत्तीसगढ व मध्यप्रदेशातील काही जिल्हे शिवनी, बालाघाट व छिंदवाडा जिल्ह्यात प्रसिद्ध यात्रा आहे. यात्रेमध्ये विविध घरोपयोगीची १२०० ते १५०० दुकाने लावली जातात. ज्या वस्तु बाहेर मिळत नाहीत त्या घरोपयोगी वस्तु येथे मिळतात. पन्नास ते साठ हजारापर्यंत भाविकाची ये-जा असते. या यात्रेमध्ये कोट्यावधीची उलाढाल होते. ही यात्रा चार दिवसपर्यंत चालते. त्यामुळे एकेकाळी पाटील घोडा बाजार-खरेदी विक्री करिता प्रसिद्ध होता.
मागील वर्षी दोन घोडे आले होते. त्याचा कोणी खरीददार न मिळाल्यामुळे ते परत गेले. यावर्षी मात्र येथील घोडा बाजारात खरेदी-विक्री करिता घोडे आलेच नाही. येथील घोडा बाजार या यांत्रिकी युगामध्ये लोप होण्याच्या मार्गावर आहे.