तुमसर तालुक्यात किडीने धान पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 05:00 AM2021-10-09T05:00:00+5:302021-10-09T05:00:39+5:30

तुमसर तालुका हा धानाचे कोठार म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु सध्या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. परतीच्या पावसाने हलक्या व मध्यम धान पिकाला पावसाने झोडपले. त्यामुळे शेतात पाणी साचले आहे. सध्या येथील धान पिकावर गाद, मावा, तूड तुडा या किडीने धान पिकावर आक्रमण केले आहे. परिणामी धान पिकला मोठा धोका निर्माण झाला आहे. 

On the way of destruction of paddy crop by insects in Tumsar taluka | तुमसर तालुक्यात किडीने धान पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

तुमसर तालुक्यात किडीने धान पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : परतीच्या पावसाने हलक्या व मध्यम पिकांचे मोठे नुकसान केले असून धानावर मावा, तुड तुडा करपा, गाद इत्यादी किडीने धान पीक फस्त करणे सुरू आहे. शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन हजाराचे औषध फवारणी करावी लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा व आर्थिक मदतीची मागणी पं. स. सदस्य हिरालाल नागपुरे यांनी मुख्यमंत्री व कृषी मंत्र्याकडे केली आहे.
तुमसर तालुका हा धानाचे कोठार म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु सध्या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. परतीच्या पावसाने हलक्या व मध्यम धान पिकाला पावसाने झोडपले. त्यामुळे शेतात पाणी साचले आहे. सध्या येथील धान पिकावर गाद, मावा, तूड तुडा या किडीने धान पिकावर आक्रमण केले आहे. परिणामी धान पिकला मोठा धोका निर्माण झाला आहे. 
धान पिवळसर झाली असून किडीच्या आक्रमणामुळे संपूर्ण धान उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. येथील शेतकरी धान पीक बसावा याकरिता एक री  दोन ते तीन हजार रुपये औषध फवारणी वर खर्च करीत आहे. त्यानंतरही धान पीक वाचेल काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकारी सध्या बांधावर भेट देत आहेत. या परिसरात कृषी सहाय्यक एच.एन. पडारे, मंडळ कृषी अधिकारी ए.एस.बागडे यांनी शेतातील धाणाची पाहणी केली. सुरुवातीला तुमसर तालुक्यात पावसाने दगा दिला होता. त्यानंतर परतीच्या पावसाने झोडपून काढले. 
सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे धान पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. किडीचे प्रमाण कमी होत नाही या विवंचनेने मध्ये येथील शेतकरी आहे. हाती आलेले पीक जाईल काय अशी चिंता त्यांना सतावत आहे. काही परिसरामध्ये किडीने धान उद्ध्वस्त केले असल्यामुळे त्या धानाचा सध्या तनस झाला आहे. 
कृषी व महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य माजी सभापती कलाम शेख, बाजार समिती संचालक बालकदास ठवकर, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल वराडे, माजी सरपंच विजय चौधरी, सरपंच गडी राम बांडेबुचे यांनी मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

 

Web Title: On the way of destruction of paddy crop by insects in Tumsar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app