शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

वाकाटक काळाची साक्ष देताहेत शिलाप्रकस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 11:22 PM

वाकाटक राजेशाहीची, संस्कृतीची ओळख करून देणारे शिलाप्रकस्थ (डालमेंट्स) पवनी तालुक्यातील खैरी तेलोता पिंपळगाव येथे आहेत. अशाच प्रकारचे शिलाप्रकस्थ तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पाहुनगावजवळील जंगलातील भातसरा तलावाजवळ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : वाकाटक राजेशाहीची, संस्कृतीची ओळख करून देणारे शिलाप्रकस्थ (डालमेंट्स) पवनी तालुक्यातील खैरी तेलोता पिंपळगाव येथे आहेत. अशाच प्रकारचे शिलाप्रकस्थ तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पाहुनगावजवळील जंगलातील भातसरा तलावाजवळ आहे. अनेक शतकापूर्वीचे हे प्राचीन ऐतिहासिक शिला प्रकस्थ उन्हा, पाऊस, वारा, वादळ यांचा सामना करीत वाकाटक काळाची साक्ष देत आजही उभे आहेत. या प्राचीन शिलाप्रकस्थांचे संरक्षण करण्याची गरज आहे.ऐतिहासिक, प्राचीन पवनी नगरात आजही खोदकामात प्राचीन वस्तू मिळतात. अनेक शतकाच्या पुर्वी पवनी हे बौद्ध धर्माच्या प्रसाराचे केंद्र होते. सम्राट अशोकाच्या काळात पवनी नगराला फार महत्व होते. १९६७-७० मध्ये पुरातत्त्व विभाग व नागपूर विद्यापीठाने डॉ. मिराशी व डॉ. देव यांच्या मार्गदर्शनाखाली जगन्नाथ टेकडीच्या खाली केलेल्या खोदकामात भारतातील सर्वात मोठा प्राचीन बौद्धस्तुप आढळून आला आहे. या स्तुपाचे अवशेष आजही मुंबई, दिल्लीच्या वस्तुसंग्रहालयात ठेवले आहेत. सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा ही पवनी मार्गे बौद्धधर्माचा प्रसार करण्याकरिता दक्षिणेत गेल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो.इ.स. सातव्या शतकात गुप्त वंशाचे राज्य भारतात होते. त्यांची राजधानी पाटलीपुत्र होती. या गुप्तवंशात समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, विक्रमादित्य आदी सम्राट होऊन गेले. त्यावेळेस विदर्भात वाकाटक राजाचे राज्य होते. वाकाटक पराक्रमी असल्यामुळे नाते संबंध जोडले होते. या वाकाटकांची राजधानी नंदिवर्धन आताचे नगरधन होती. या वाकाटकांनी पवनी तालुक्यावरही आपले राज्य विस्तारले होते.वाकाटकाच्या काळात त्यांच्या साम्राज्याची ओळख व्हावी याकरिता गावागावात शिलाप्रकस्थ डालमेंट्स स्थापीत केले होते. हे शिलाप्रकस्थ वाकाटकच्या स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहेत. चुलीच्या आकाराचे तीन दगड ठेवून त्यावर एक मोठा भव्य सपाट दगड ठेवला आहे. या शिलाप्रकस्थांना स्थानिक लोक तेलगोटा म्हणतात. काही लोक त्यांची पूजाही करतात. हे शिलाप्रकस्थ खैरी तेलोता, पिंपळगाव येथे आहेत. पण अशाच प्रकारचे एक शिलाप्रकस्थ पवनी पासून ७ कि़मी. अंतरावरील पाहुनगाव जवळील जंगलातील भानसरा तलावाजवळ आहे. या जंगलाचा समावेश उमरेड-कºहांडला-पवनी अभयारण्यात करण्यात आल्यामुळे येथे जाण्याला बंद घालण्यात आली आहे.हे डालमेंट्स खुल्या जागेत उन्हा, पाऊस, वादळ, वारा यांचा सामना करीत वाकाटक साम्राज्याची ओळख देत आजही उभे आहेत. पुरातत्व विभागाने या प्राचीन शिलाप्रकस्थांची ओळख व प्रसिद्धी करून दिल्यास तालुक्यात झपाट्याने वाढत असलेल्या पर्यटन क्षेत्रात अजून भर पडणार आहे व शिलाप्रकस्थ असलेले स्थळे पर्यटनस्थळाच्या यादीत यावयास वेळ लागणार नाही. 

टॅग्स :historyइतिहासtourismपर्यटन