३९ लाख रुपयांचा पाणी पट्टीकर थकीत

By Admin | Updated: March 12, 2016 00:35 IST2016-03-12T00:35:04+5:302016-03-12T00:35:04+5:30

दीड लक्ष नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या भंडारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नागरिकांनी पाणी पट्टीकर लक्षावधी रूपयांनी अडवून ठेवला आहे.

Water worth 39 lakh rupees is tired | ३९ लाख रुपयांचा पाणी पट्टीकर थकीत

३९ लाख रुपयांचा पाणी पट्टीकर थकीत

इंद्रपाल कटकवार भंडारा
दीड लक्ष नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या भंडारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नागरिकांनी पाणी पट्टीकर लक्षावधी रूपयांनी अडवून ठेवला आहे. जवळपास ३९ लक्ष रूपये थकीत असल्याने बरीचशी कामेही अडकली आहेत. शहरात शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याची बोंब असताना दुसरीकडे नागरिक व शासकीय कार्यालयांनी लक्षावधींची पाण्याची बिले लटकवून ठेवली आहे.
तृष्णातृप्ती करणारे पाणी वैनगंगेच्या पदरात असतानाही भंडारेकरांना शुद्ध पाण्यासाठी तरसावे लागत असल्याचा प्रकाराला भंडारेकर वैतागले. कित्येक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची मुबलकता यावी, या दृष्टीकोनातून साकारण्यात येणारे प्रयत्न व निर्णय फसले आहेत. भविष्यकालीन योजना अंमलात आणण्याची तयारी सुरू झालेली नाही.
हा उन्हाळाही नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठ्यात काढावा लागणार आहे. दुसरीकडे दीड दशकापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून भंडारा शहरात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगर पलिकेच्या खांद्यावर देण्यात आली.
आजघडीला शहरात जवळपास १० हजार ५०० च्यावर नळ ग्राहकांची संख्या आहे. ज्या शासकीय कार्यालयांमध्ये पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी पुरवठा केला जातो, त्या कार्यालयांची बिले नियमित असल्याचे दिसून येते.

नागरिकांनी वेळेवर पाणी पट्टीकर दिल्यास त्याचा नगर पलिकेला फायदाच होईल. पाण्याची समस्या पाहता नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. तसेच शहरात कुठेही जलवाहिनी लिकेज असल्यास त्याची माहिती पाणी पुरवठा विभागाला द्यावी, याची तत्काळ दखल घेण्यात येईल.
- रवींद्र देवतळे,
मुख्याधिकारी,
नगर परिषद, भंडारा.

१ कोटी ८३ लाख रूपयांचे उद्दिष्ट
भंडारा नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे सन २०१५-१६ मध्ये १ कोटी ८३ लक्ष रूपयांची पाणीपट्टी वसुली करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी वित्तीय वर्षात चालु महिन्यात ३९ लाखांची ‘आऊटस्टॅडिंग’ उर्वरित आहे. म्हणजेच नळग्राहकांकडून पाणीपुरठयाचे ३९ लक्ष रूपये घेणे शिल्लक (घेणे) आहे.
जीर्ण जलवाहिनी व पालिकेच्या नियोजनशुन्य प्रशासनामुळे शहरातील समांतर पाणी वाटप होत नाही, असे नागरिकांचे म्हणने. अव्वा सव्वा बिल दिले जाते. पाणी येण्यापूर्वी जलवाहिनीतील हव्याच्या दाबामुळे मीटर जलद गतीने फिरते ; मात्र मुबलक व शुद्ध प्रमाणात पाणी मिळत नाही. बील भरण्यासाठी म्हटल्या जाते. हवचा पैसा द्यायचा काय? पंरतु पाणीपुरवठ्याच्या सुविधांमध्ये बदल केला जात नसल्याचे ग्राहकांचे म्हणने आहे.

Web Title: Water worth 39 lakh rupees is tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.