पिंपळगावात दूषित पाणीपुरवठा

By Admin | Updated: October 5, 2015 01:04 IST2015-10-05T01:04:27+5:302015-10-05T01:04:27+5:30

तालुक्यातील पिंपळगाव (सडक) हे राष्ट्रीय महामार्गावरील महत्वपूर्ण ठिकाण आहे. समृध्द आत्म सांस्कृतिक परंपरा ...

Water supply to Pimpalgaon | पिंपळगावात दूषित पाणीपुरवठा

पिंपळगावात दूषित पाणीपुरवठा

३० लाखांचा प्रस्ताव : स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची गरज
चंदन मोटघरे लाखनी
तालुक्यातील पिंपळगाव (सडक) हे राष्ट्रीय महामार्गावरील महत्वपूर्ण ठिकाण आहे. समृध्द आत्म सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या पिंपळगावात अनेक ठिकाणे पावसाळ््यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जानवत आहे. राष्ट्रीय महामार्गावर ३ कि.मी. पर्यंत पिंपळगाव विखुरलेले आहे. पिंपळगावातील इंदिरा नगर, भिमटोली या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. ग्रामपंचायतच्या पुढाकाराने पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी तो अपुरा आहे.
पिंपळगावची चार हजार पाचशे लोकसंख्या आहे व गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने विखुरलेले आहे. पिंपळगाव-सामेवाडा रस्ता, पिंपळगाव-मुरमाडी (तुपकर) रस्ता व तीन कि.मी. पर्यंत राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वसाहत आहे. येथील पाणीपुरवठा योजना लाखनीतील ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कार्यान्वित केली जात आहे. १९८० ला तयार झालेली व १९८४ ला कार्योन्वित केलेली योजना आजतागायत कायम आहे. अशोका बिल्डकॉनद्वारे राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सुरु असतांनी पाणीपुरवठा योजना ठप्प पडलेली होती. दोन वर्षापूर्वी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची ११० जोडणी होती. पाणी पोहचत नसल्यामुळे व आकारणी न दिल्यामुळे काही जोडणी बंद करण्यात आले. सद्या केवळ ५८ जोडणी आहेत. सन २०१३-२०१४ मध्ये ग्राहकाकडून २ लाख ८१ हजार ३०० रुपयेची पाणीपट्टी आकारणी होते ती कमी करण्यात आली. वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण होत ताही सन् २०१४-२०१५ मध्ये १ लाख ९९ हजार ८६० रुपयाचे वसुलीचे उद्दिष्ट होते. अद्यापपर्यंत ५० हजार रुपयापर्यंत वसुली करण्यात आलेली आहे.
पिंपळगाव (सडक) येथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची गरज आहे. १९८४ मध्ये तयार करण्यात आलेली ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी निष्कृष्ट अवस्थेत आहे. त्या टाकीत पाणी जमा होत नाही. जोडणीधारकांना जांभळी बंधारा येथील पंपहाऊ स वरुन सरळ पाणी पुरविले जाते. पाण्याचे शुध्दीकरण न करता पाणी पुरविले जात असल्याने जनतेच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसाळ््यात गढूळ पाण्याचा पुरवठा केला जातो. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला ग्रामपंचायतने पंपहाऊ स वरुन सरळ जोडणीधारकांना पाणीपुरवठा करण्याबाबचे ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. पिंपळगाव येथील पाण्याची टाकी केव्हाही पडू शकते. इतकी जर्जर झाली आहे. पाण्याची टाकी पाडणे आवश्यक आहे. अन्यथा धोका निर्माण होवू शकतो. शासनाची जीवन प्राधीकरणची योजना तयार आहे. परंतु सदर जिल्हा परिषदेने स्विकारली नाही. पिंपळगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात एक लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी तयार आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अभियंत्याना सदर योजना स्विकारली नाही. ग्रामपंचायतने पाण्याची टाकी व योजनेचा भार उचलावा अशी अपेक्षा आहे. जिल्हा परिषदेने जीवन प्राधीकरणच्या नळयोजनेचा भार पेलवू शकणार नसल्याची चर्चा आहे.

Web Title: Water supply to Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.