माथ्यावरून पाणी अन् पायथ्याशी कोरडे

By Admin | Updated: April 20, 2016 00:51 IST2016-04-20T00:51:48+5:302016-04-20T00:51:48+5:30

पूर्व विदर्भात हरितक्रांती होईल असे स्वप्न पवनी तालुक्यातील जनता पाहू लागली आहे.

Water from the head to the bottom and dry to the bottom | माथ्यावरून पाणी अन् पायथ्याशी कोरडे

माथ्यावरून पाणी अन् पायथ्याशी कोरडे

व्यथा धानोरी ग्रामस्थांची : लघु कालव्याचे नियोजन अधांतरी
अशोक पारधी पवनी
पूर्व विदर्भात हरितक्रांती होईल असे स्वप्न पवनी तालुक्यातील जनता पाहू लागली आहे. गोसीखुर्द धरणामुळे उजव्या कालव्याद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील आसोला मेंढा जलाशयात १०० किलोमिटर अंतरावर पाणी पोहचले. परंतु कालव्याच्या २५ कि.मी. पर्यंतचे शेतकरी सिंचनाच्या सोयीपासून वंचित आहेत. उजव्या कालव्याचे ० ते २५ कि.मी. अंतरापर्यंत तालुक्याचे सीमेतील गाव आहेत. त्यापैकी काही गावातील मोजक्याच शेतकऱ्यांना लघु कालव्याद्वारे सिंचन होऊ लागले आहे.
धानोरी सारखे अजूनही कित्येक गाव सिंचनाच्या सोयीपासून वंचित आहेत. धानोरी गावाच्या माथ्यावरून उजवा कालव्यामधून पाणी वाहत आहे. परंतु लघु कालव्यांचे नियोजन करण्यात न आल्याने काल्याचे पायथ्याजवळची १०० एकर शेतजमीन कोरडी असून सिंचन सोयी पासून वंचित आहे.
गोसीखुर्द धरण राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित झाला. तेव्हा राजकारणी श्रेय लाटण्यात स्वत:ला धन्य समजत होते. वाटेल त्या व्यासपीठावरून लोकांना सांगत सुटले होते की प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु शेतकऱ्यांना सिंचन देण्यात खारूताईचा वाटा उचलण्यात त्यांना धाडस उरलेला नाही. उजवा कालवा वाहत असलेल्या गावात कोरंभी, बेलघाटा, कोदुर्ली, रेवळी,धानोरी, भोजापूर सिंधी, शेडी, खातखेडा, सावरला या गावातील शेतीचा समावेश आहे.
या गावातील शेतशिवारात लघु कालवे काढण्यात आलेली आहेत. परंतु हे सर्व अपूर्ण आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली. त्यामुळे ते उन्हाळी धानाचे पीक घेवू लागले आहेत.
पवनी तालुक्यातील लघु कालवे अपूर्ण असल्याने ज्या शेतकऱ्यांचे शेतापर्यंत नेऊन थांबविण्यात आले आहेत त्यांचे शेतात अतिरिक्त पाणी साचत असल् याने त्यांचे नुकसान होत आहे.
तर धानोरी, भोजापूर, शेळी, खातखेडा व सावरला गावातील शेतशिवारात लघु कालव्याचे नियोजन न केल्याने कालव्यांचे बांधकाम करण्यात आलेले नाही.
शेकडो हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे. धानोरी येथील ग्रामस्थांनी गेल्या वर्षभरापूर्वी लघु कालवा काढल्यास शंभराहून अधिक एकर शेती सिंचीत होऊ शकते असे अधिकारीवर्गास निवेदन देऊन लक्षात आणून दिले. अधिकारीवर्गांनी मागणीचा विचार करून शेतशिवाराची पाहणी केली व शेतकऱ्यांना आश्वस्त केले. परंतु कालव्याचे नियोजन होऊ शकले नाही. त्यामुळे या हंगामात शेती कोरडी आहे. लोकप्रतिनिधी विचार करून शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होवू लागली आहे.

Web Title: Water from the head to the bottom and dry to the bottom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.