डॉक्टरांअभावी आयुर्वेदिक दवाखाना वार्यावर
By Admin | Updated: June 4, 2014 23:30 IST2014-06-04T23:30:44+5:302014-06-04T23:30:44+5:30
तालुक्यातील मानेगाव बाजार येथील आयुर्वेदिक दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. दवाखान्यात तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

डॉक्टरांअभावी आयुर्वेदिक दवाखाना वार्यावर
भंडारा : तालुक्यातील मानेगाव बाजार येथील आयुर्वेदिक दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. दवाखान्यात तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
आयुर्वेदिक दवाखाना येथे डॉ.वर्मा यांची काही दिवसांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु सद्यस्थितीत येथील दवाखान्यात आरोग्य अधिकारी नसून रुग्णांची गैरसोय होत आहे. सध्या मग्राराग्रारोहयोची कामे सुरु असून वातावरण अती उष्ण असल्यामुळे मजुरांचे आरोग्याचे अनेक प्रश्न उद्भवत आहेत.
येथील आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये मानेगाव बाजारच्या आजूबाजूच्या गावातील तिड्डी, मकरधोकडा, बोरगाव, गराडा, बासोरा, मेंढा, टेकेपार, झबाडा, संगम, पिपरी, जाख, अर्जुनी, खोलापूर व इतर गावातून दररोज अनेक रुग्ण येत असतात व १00 ते १५0 रुग्ण रोज तपासले जातात. करिता वरील विषयाचा गंभीरतेने विचार करून व रुग्णांची गैरसोय लक्षात घेता मानेगाव बाजार येथील आयुर्वेदिक दवाखान्यात दोन दिवसाच्या आत डॉ.वर्मा यांच पूर्ववत नियुक्ती करावी अन्यथा या विरोधात जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा नरेश येवले, नत्थू बांते, अभय आगासे, महेश ढोमणे, दिलीप गभणे यांच्यासह २९ नागरिकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे. (नगर प्रतिनिधी)