लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सहा जणांचा अपघातात बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली. साकोलीपासून अवघ्या तीन किमी अंतरावरील धर्मापुरी कुंभली येथील चुलबंद नदीच्या पुलावरील माती काढून परिसराची साफसफाई करण्यात आली. याचा नेमका अर्थ काय, हे मात्र नागरिकांना उमगले नाही.साकोली लाखांदूर राज्य मार्गावर कुंभली येथे चुलबंद नदीवर जुना पुल आहे. या पुलावर काही दिवसांपूर्वी मोठाले खड्डे पडले होते. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले. विशेष म्हणजे या ठिकाणी मकरसंक्रांतीला दुर्गाबाई डोहाची यात्रा भरते. लाखो लोक येथे येतात. परंतु या पुलाकडे दुर्लक्ष होतो. या पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात माती साचली आहे. रस्त्याच्या बाजूला झुडपेही वाढली आहेत. त्यामुळे पुलावरून जाताना वाहन चालविणे कठीण झाले होते. परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. दोन दिवसापूर्वी काळीपिवळी जीप पुलावरून खाली कोसळली आणि सहा जणांचा बळी गेला. यानंतर प्रशासन खळबडून जागे झाले. दुसऱ्या दिवशी पुलावर असलेली माती, केरकचरा साफ करण्यात आला. पुलाच्या दोन्ही बाजूला असलेला कचरा ट्रॅक्टरच्या सहाय्याने साफ केला. यावरून स्पष्ट होते की, जोपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही तोपर्यंत प्रशासन जागे होत नाही. या पुलावर गतीरोधकाचीही गरज आहे.पुलाची चौकशी कराकाळीपिवळी अपघातानंतर या पुलाचे दहा ते बारा कठडे तुटले. या पुलाला जोरदार धक्का बसला. त्यामुळे या पुलावर काय परिणाम झाला याची चौकशी करण्याची गरज आहे. समोर पावसाळा आहे. त्यामुळे पुन्हा असा भीषण अपघात होऊ नये म्हणून पुलाची चौकशीची गरज आहे.
अपघातानंतर प्रशासनाला जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:12 IST
सहा जणांचा अपघातात बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली. साकोलीपासून अवघ्या तीन किमी अंतरावरील धर्मापुरी कुंभली येथील चुलबंद नदीच्या पुलावरील माती काढून परिसराची साफसफाई करण्यात आली. याचा नेमका अर्थ काय, हे मात्र नागरिकांना उमगले नाही.
अपघातानंतर प्रशासनाला जाग
ठळक मुद्देसहा जणांचा बळी : चुलबंद नदीवरील पुलाची साफसफाई