पाणीटंचाई आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: February 25, 2015 01:09 IST2015-02-25T01:09:32+5:302015-02-25T01:09:32+5:30
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी अनेक गावात मिळत नाही तसेच विहीरी कोरड्या पडत आहेत.

पाणीटंचाई आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत
चंदन मोटघरे लाखनी
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी अनेक गावात मिळत नाही तसेच विहीरी कोरड्या पडत आहेत. तालुक्यात पाणी टंचाई बहृद आराखडा तयार करण्यात आला आहे. खंडविकास अधिकारी व तहसिलदार यांनी जानेवारी ते मार्च २०१५ पर्यंत टंचाई निवारनार्थ ३ गावांची निवड केली आहे तर एप्रिल ते जुन २०१५ पर्यंतसाठी टंचाई निवारनार्थ ९ गावांची निवड प्रशासनाने केली आहे.
तालुक्यात १०२ गावे आहेत यापैकी निम्म्यापेक्षा जास्त गावात पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते.
जानेवारी ते मार्चपर्यंत पेंढरी येथे नळयोजना कार्यान्वित करण्यासाठी १ लक्ष रुपयाचे कामांची मागणी करण्यात आली आहे. पोहरा येथे नळ योजना पाईप लाईन दुरुस्तीसाठी २ लक्ष रुपयाचा खर्च अपेक्षित आहेत. मुरमाडी (तुपकर) येथे नळ योजना पुरवठा व विहीरीतील गाळ उपसणे यासाठी एक लक्ष रुपयांची गरज आहे. तिन्ही गावात सद्या हातपंप, सार्वजनिक विहीरी व नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु उन्हाळ्यात वरील गावात पाण्याची तिव्र टंचाई भासते पाणी टंचाई बृहद आराखड्यानुसार एप्रिल ते जुन महिण्यात ९ गावात पाणीटंचाईसाठी पुरक कामे करावयाची आहेत. यात खराशी येथिल धानला टोली येथे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी १ विंधन विहीर तयार करणे व विहीरीतल खोलीकरण करून गाळ काढणे यासाठी १ लक्ष १० हजार रुपयाचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.
मानेगाव येथे ९० हजार रुपयाचे १ विंधन विहीर प्रस्तावित केली आहे. पाथरी येथे दोन विहीरीचे खोलीकरण व गाळ काढण्यासाठी ४० हजार रुपयाची मागणी केली आहे. नरव्हा येथे ९० हजार रुपयाचे १ हातपंप, गोंडसावरी येथे २ विहीरीचे खोलीकरण, पिंपळगाव (सडक) येथे टोलीवर विहीर खोल करणे व गाळ काढण्यासाठी ४० हजाराची मागणी केली आहे.
तालुक्यातील किन्ही येथे टोलीवरील विहीर खोल करणे, चान्ना येथे नळयोजनेची पुरवठा विहीर खोल करणे गाळ काढण्यासाठी एक लक्ष रुपयाची कामे प्रस्तावित आहेत. परसोडी (पवार) येथे विंधन विहीर व दोन विहीर खोल करण्यासाठी ४० हजार रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.
तालुक्यातिल १२ गावात पाणी टंचाई निवारनार्थ कामासाठी ९ लक्ष ७० हजार रुपयाची गरज आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागा जिल्हा परिषद भंडारा यांनी टंचाई निवारनार्थ कामांना अद्यापही मंजुरी मिळाली नाही. पाणीप्रश्न बिकट बनल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का हा प्रश्न नागरिकांना निर्माण होत आहे.