ढिवरधुटी पर्यटनस्थळाला विकासाची प्रतीक्षा

By Admin | Updated: August 7, 2015 00:47 IST2015-08-07T00:47:19+5:302015-08-07T00:47:19+5:30

खापरी कोरंभीच्या घनदाट जंगलात ३० फूट उंच डोंगराच्या माथ्यावरून पांढऱ्या शुभ्र पडणाऱ्या जलधारा पाहून पर्यटकांना मोहून टाकणाऱ्या ढिवरधुटी ...

Waiting for the development of the Dhighadhuti tourist place | ढिवरधुटी पर्यटनस्थळाला विकासाची प्रतीक्षा

ढिवरधुटी पर्यटनस्थळाला विकासाची प्रतीक्षा

प्रवेशावर बंदी तर मिळू शकतो महसूल
अशोक पारधी पवनी
खापरी कोरंभीच्या घनदाट जंगलात ३० फूट उंच डोंगराच्या माथ्यावरून पांढऱ्या शुभ्र पडणाऱ्या जलधारा पाहून पर्यटकांना मोहून टाकणाऱ्या ढिवरधुटी या पर्यटनस्थळाचा समावेश उमरेड करांडलाच्या पवनी वन्यजीव अभयारण्यात करण्यात आला आहे. त्यामुळे ढिवरधुटी या वर्षाकालीन धबधब्यावर जाण्याकरिता पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
अभयारण्य विभागाने ढिवरधुटी या वर्षाकालीन पर्यटकांचा विकास केल्यास, पूर्व विदर्भातील एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून ढिवरधुटी नावारुपास येण्यास भरपूर वाव आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल.
पवनी पासून ९ किलोमिटर अंतरावर खापरी कोरंभीच्या डोंगरामध्ये धिवरधुटी हा नैसर्गिक धबधबा आहे. माध्यमांच्या पाठपुराव्यामुळे लुप्त झालेले हे पर्यटनस्थळ जनतेच्या नजरेत आले. मागील सात वर्षात हजारो पर्यटकांनी या पर्यटनस्थळाला भेट दिली आहे. पर्यटकांनी या निसर्गरम्य परिसराचा स्वच्छंदपणे आनंद घेतला आहे. धिवरधुटी धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी असल्यामुळे जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दूरवरून येथे येत होते.
३० फूट उंचीवरून धिवरधुटी सदृष्य खोलगट भागात पडणाऱ्या जलधारेचे दृष्य व सभोवताल असलेले डोंगर व त्यावरील वनराजी पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे.
कोरंभी डोंगर महादेव मंदिरासमोर पायऱ्या चढत पोहचल्यानंतर डावीकडे जंगलात जाणाऱ्या मार्गाने काही अंतरावर उजवी काही अंतरावर उजवीकडे जंगलातील मलाई तलावाकडे जाणारा मार्ग आहे. या तलावाच्या पाळीवरून सुमारे तीन कि.मी. अंतरापर्यंत पायी चालत जावे लागते. धिवरधुटी पासून तलावापर्यंत वाहत आलेल्या झऱ्याचे ओढ्यात रुपांतर होते. तीन किलोमिटर पायी चालल्यानंतर आलेला थकवा धिवरधुटी मनोहारी निसर्गरम्य सौंदर्य पाहून नाहीसा होतो.
परंतु ढिवरधुटी या पर्यटनस्थळाचा समावेश उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात करण्यात आला आहे. त्यामुळे या जंगलातील या पर्यटनस्थळाला भेट देण्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात ढिवरधुटी पर्यटन क्षेत्रात पर्यटकांना प्रवेशबंदी केल्यामुळे धिवरधुटी पाहणाऱ्याहजारो पर्यटन प्रेमींमध्ये निराशा पसरली आहे. अभयारण्य विभागाने धिवरधुटी चा विकास करून पावसाळ्यात पर्यटकांना प्रवेश देण्यावर विचार केल्यास पूर्व विदर्भातील धिवरधुटी हे पर्यटनस्थळ म्हणून समोर येईल.

Web Title: Waiting for the development of the Dhighadhuti tourist place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.