मोरगावच्या पुलाला अपघाताची प्रतीक्षा
By Admin | Updated: November 26, 2014 23:00 IST2014-11-26T23:00:53+5:302014-11-26T23:00:53+5:30
पश्चिमेस असणाऱ्या पंचवीस गावाची रहदारी सोसणारा मोरगाव-महालगाव मधात असणाऱ्या नरीवरच्या पूलाला भगदाड तसेच तो पूल पूर्णत: उखडला असताना जिल्हा परिषदेचा सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या

मोरगावच्या पुलाला अपघाताची प्रतीक्षा
राजू बांते - मोहाडी
पश्चिमेस असणाऱ्या पंचवीस गावाची रहदारी सोसणारा मोरगाव-महालगाव मधात असणाऱ्या नरीवरच्या पूलाला भगदाड तसेच तो पूल पूर्णत: उखडला असताना जिल्हा परिषदेचा सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या अपघाताची प्रतिक्षा करीत आहेत.
मोरगाव-महालगाव या गावच्या मधात गायमुख नदी आहे. तीन दशकापूर्वी या नदीवर पूलाचा निर्माण करण्यात आला. हा पूल पायल्यांवर उभा केला गेला आहे. या पूलासाठी कान्हळगावच्या स्थानिक नेत्यांनी संघर्ष केला होता. मोहाडीला जोडणारा हा महत्वाचा पूल आहे. या पुलावरील २५ गावाचे लोक, विद्यार्थी मोहाडीला आवागमन करतात. पुलाच्या निर्माण झाल्यापासून आजवर कोट्यवधी रूपयाच्या घरात या पुलावर रूपये खर्च करण्यात आले. ज्यांना या पुलाचा काम करण्याची दरवर्षी संधी मिळाली त्या अधिकारी व कंत्राटदारांनी चांगली कमाई केली.
मोरगावच्या पुलाला आजघडीला ३० वर्षापेक्षा अधिक वर्ष झाली तरी प्रत्येक वर्षीच्या पावसाच्या प्रवाहात या पुलाची दैनावस्था होत असते. यावर्षीच्या पावसाच्या प्रवाहाने पुलाचा वरचा भाग पूर्णत: उखडला आहे. जागोजागी पॅचेस पडले आहेत. पुलावरच्या एका भागास पुलाच्या आरपार मोठा खड्डा पडलेला आहे. या पुलावरून वाहने चालविणे अतिशय धोकादायक झाले आहे. या पुलावरून रात्री येताना येणाऱ्यांना अनेकदा विचार करावा लागतो. या पुलावरुन कित्येकजण खाली पडले आहेत. मोरगावचा पूल अपघातप्रवणस्थळ बनलेला आहे. या पुलावरून लोकप्रतिनिधीही ये-जा करतात. मात्र जनतेसाठी तयार करण्यात आलेल्या पुलाची दुरूस्ती करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी समोर येत नाही. जिल्हा परिषदेचा तुमसर सार्वजनिक बांधकाम उपविभाग अजूनही निद्रीस्त आहे.
पुलाची उंची वाढवा
मोरगावचा पूल कंत्राटदारांसाठी कमाईचे साधन ठरले आहे. या पुलावरून येणारे विद्यार्थी, रहदारी करणारी जनता पडो किंवा मरो याचे घेणदेण नसलेला बांधकाम विभाग दुरून जनतेच्या सहनशिलतेची परीक्षा घेत आहे. दरवर्षी लाखो रूपये पाण्यात जाण्यापेक्षा मोरगावच्या पुलाची उंची वाढविली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे.