शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

प्रतीक्षा बागडे मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:11 PM

माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली.

ठळक मुद्देवडिलांची मागणी : पोलीस अधीक्षकांना निवेदन

आॅनलाईन लोकमतभंडारा : माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली. असा संशय व्यक्त करून या प्रकरणी सखोल चौकशी करून सदर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात यावा अशी मागणी मृत प्रतीक्षा हिचे वडील प्रकाश बागडे यांनी केली आहे. निवेदनात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.निवेदनानुसार, प्रकाश बागडे यांची प्रतीक्षा (१९) ही मुलगी १३ जानेवारीला शिकवणी वर्गाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. परंतु घरी परतली नाही. वडीलांनी मुलीच्या मोबाईलवर कॉल केला असता एका मुलाने फोन उचलला. वडीलांचा आवाज ऐकताच त्या मुलाने मोबाईल बंद केला. पोलिसांनी मुलगी परत येईल, असे सांगून त्यांना परत पाठविले. वडीलांनी संशयीत युवकांबद्दल माहिती दिली. परंतु चौकशी केली नाही. अन्यथा माझ्या मुलीचा जीव वाचला असता, पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहेत. हयगय दाखविल्याने पोलीस निरीक्षक सिडाम यांना निलंबित करण्यात यावे, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात यावा अशी मागणी आहे. शिष्टमंडळात प्रकाश बागडे, मनोज बागडे, सचिन घनमारे, अजय मेश्राम, सुहास गजभिये, विक्की बागडे, योगेश बागडे, मनोहर घरडे, रणजित घरडे, मृणाल गोस्वामी, प्रकाश घरडे यांचा समावेश होता.