मतदारांची नावे यादीतून वगळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST2021-07-03T04:22:52+5:302021-07-03T04:22:52+5:30
भंडारा : मतदार याद्यांमध्ये मतदारांच्या नावापुढे त्यांचे छायाचित्र अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाही, अशा ...

मतदारांची नावे यादीतून वगळणार
भंडारा : मतदार याद्यांमध्ये मतदारांच्या नावापुढे त्यांचे छायाचित्र अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाही, अशा मतदारांना छायाचित्र निवडणूक विभागाकडे जमा करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत ५ जुलै रोजी संपणार आहेत. मात्र, अद्यापही २१,०४० मतदारांनी आपले छायाचित्र निवडणूक विभागाकडे जमा केले नाही. त्यामुळे आता त्यांनी ५ जुलैपर्यंत छायाचित्र जमा न केल्यास त्यांची नावे मतदार यादीतून कमी केली जाणार आहेत.
यासंदर्भात पत्र जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढले आहे. भारत निवडणूक आयोगाने २४ ऑगस्ट २०२० च्या पत्रानुसार १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम जाहीर केला आहे.
१५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली या चारही विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी जाहीर केली. छायाचित्र नसलेल्या ९७८९ मतदार रद्द झाले.
कोट
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्वच मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत असणे अनिवार्य आहे. यासाठी विशेष कार्यक्रमसुद्धा निवडणूक विभागातर्फे राबविण्यात आला. जिल्ह्यातील २१०४० मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नसून, त्यांनी जुलैपर्यंत छायाचित्र निवडणूक विभागाकडे जमा करणे अनिवार्य आहे.
-महेश पाटील,
उपजिल्हाधिकारी(निवडणूक), भंडारा