दिग्गजांची कृषी प्रदर्शनाला भेट

By Admin | Updated: February 12, 2016 01:23 IST2016-02-12T01:23:26+5:302016-02-12T01:23:26+5:30

दिवंगत मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्णपदकाने गौरविण्यात आले.

Visit to the exhibition of veterans | दिग्गजांची कृषी प्रदर्शनाला भेट

दिग्गजांची कृषी प्रदर्शनाला भेट

जिल्ह्यातील उत्पादन : औचित्य मनोहरभाई पटेल जयंतीचे
भंडारा : दिवंगत मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. त्यापूर्वी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या फळभाज्यांसह विविध पिकांच्या प्रदर्शनीला सिनेअभिनेता सलमान खान, इंडिया टीव्हीचे प्रबंध संचालक रजत शर्मा, मिडीया गुरू सुहेल सेठ यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी भंडारा व गोंदिया या शेतीप्रधान जिल्ह्यातील शेतकरी आता पारंपारिक शेती सोडून प्रगतशेतीकडे वळल्याचे आणि उत्पादित फळ व पिकांची गुणवत्ता व शरीरासाठी कसे लाभदायक आहेत, हे त्यांना सांगितले. यापूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक प्रात्याक्षिक सादर करीत असायचे यावेळी पहिल्यांदाच खासदार पटेल यांनी कृषी उत्पादनावरील फळपिकांचे प्रदर्शन लावण्यासाठी सांगितले होते. यात प्रगतशील शेतकरी भालचंद्र ठाकूर, महेंद्र ठाकूर, अंजली ठाकूर, डॉ. दिलीप कापगते, प्रभू डोंगरवार, दीपक चावडा, राणू रहांगडाले, लता रहांगडाले, के.बी. चौहान, चोपराम कापगते, ललित मोहनलाल बिसेन, मुन्ना पाचे, हर्षित जतपेले यांच्यासह काही प्रगत शेतकऱ्यांचे फळ व पिके याठिकाणी ठेवण्यात आले होते.
यावेळी धानाची हिरवी पेंडी पाहुण्यांना दाखविण्यासाठी ठेवण्यात आली होती. याशिवाय कोबी, पपई, केळी सोबतच स्ट्राबेरी, शेवग्याच्या शेंगा यासह विविध फळ व भाजीपाले ठेवण्यात आले होते. यावेळी मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, आमदार राजेंद्र जैन, माजी मंत्री अनिल देशमुख, पुर्णा पटेल, प्रजय पटेल, माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे, माजी आमदार दिलीप बंसोड, मनोहर चंद्रीकापुरे, विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Visit to the exhibition of veterans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.