कोरोनाच्या महासंकटात घडतेय माणुसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:00 AM2020-03-28T06:00:00+5:302020-03-28T06:00:47+5:30

भंडारा शहरात विविध प्रांतातून आलेले अनेक भटके व्यक्ती व्यवसायाच्या निमित्ताने तळ ठोकून आहे. कुणी रस्त्याच्या कडेला पाल लावून तर कुणी उघड्यावरच डेरा टाकून आहेत. जिल्ह्यात २५ मार्चपासून संचारबंदी लागू झाली. भटक्यांचा व्यवसाय ठप्प झाला. जवळेचे सर्व पैसे संपले. शहरात कुणी ओळखीचे नाही, अशा अवस्थेत स्वत:सह चिल्ल्या पिल्ल्यांना दोन घास कसे खाऊ घालावे, असा प्रश्न निर्माण झाला. हीच अडचण शहरातील नगरसेवक मंगेश वंजारी यांनी ओळखली.

The vision of humanity is occurring in the coronation crisis | कोरोनाच्या महासंकटात घडतेय माणुसकीचे दर्शन

कोरोनाच्या महासंकटात घडतेय माणुसकीचे दर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देमदतीचा हात : भटक्यांसह गावाकडे जाणाऱ्यांना भोजनाची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘भूकेल्यांना अन्न, तहाणलेल्यांना पाणी’ या संत गाडगेबाबांच्या संदेशाचा प्रत्येय कोरोनाच्या महासंकटात शहरातील विविध भागात येत आहे. संचारबंदीच्या काळात भूकेने व्याकुळ झालेल्या भटक्यांच्या झोपड्यांवर जावून त्यांच्या पोटात दोन घास जावे म्हणून शहरातील सामाजिक कार्यकर्ते धडपड करताना दिसत आहे.
भंडारा शहरात विविध प्रांतातून आलेले अनेक भटके व्यक्ती व्यवसायाच्या निमित्ताने तळ ठोकून आहे. कुणी रस्त्याच्या कडेला पाल लावून तर कुणी उघड्यावरच डेरा टाकून आहेत. जिल्ह्यात २५ मार्चपासून संचारबंदी लागू झाली. भटक्यांचा व्यवसाय ठप्प झाला. जवळेचे सर्व पैसे संपले. शहरात कुणी ओळखीचे नाही, अशा अवस्थेत स्वत:सह चिल्ल्या पिल्ल्यांना दोन घास कसे खाऊ घालावे, असा प्रश्न निर्माण झाला. हीच अडचण शहरातील नगरसेवक मंगेश वंजारी यांनी ओळखली. आपल्या घरी मसाले भात तयार करून शहरातील रस्त्यांवर व्याकूळ असलेल्या या भटक्यांपर्यंत पोहचविला. शहरात विविध भागात असलेल्या भटक्यांच्या जेवणाचा प्रश्न काही अंशी सूटला आहे.
महानगरात अडकलेले काही मजूर मध्यप्रदेशासह गोंदिया जिल्ह्यातील आपल्या गावाकडे निघाले आहेत. वाहनाची कोणतीही व्यवस्था नसल्याने ही मंडळी थेट नागपूरातून पायी निघाली. भंडारा शहरात त्यांच्या नास्त्याची व्यवस्था सकाळी करण्यात आली. तुमसर येथे ही मंडळी पोहचल्यानंतर तहाणेने आणि भूकेने व्याकूळ झाली होती. हा प्रकार श्रद्धा समरीत आणि लक्ष्मी समरीत यांच्या लक्षात आला. त्यांनी पोलीस नायक मनोज भुते यांच्याशी संपर्क केला. आणि या सर्व पायी निघालेल्या प्रवाशांच्या भोजनाची व्यवस्था केली. संचारबंदीच्या काळात माणुसकीचे दर्शन होत आहे.

पोलिसांना चहापाणी
भंडारा शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात आहे. मात्र शहरात कुठेही हॉटेल, कॅन्टींन उघडी नाही. अशा पोलिसांचे काय हाल होत असतील हाच विचार मनात आला आणि खुशी बहुउद्देशिय फाऊंडेशनचे संस्थापक राजेश राऊत यांनी पोलिसांसाठी चहाची व्यवस्था केली. थर्मासमध्ये चहा घेवून चौका चौकात फिरून सर्व पोलिसांना ते चहा पाजत आहेत.

Web Title: The vision of humanity is occurring in the coronation crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.