शरीरांतर्गत संवेदनांचे दर्शन म्हणजे विपश्यना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 00:32 IST2016-03-19T00:32:55+5:302016-03-19T00:32:55+5:30
विपश्यना ही ध्यानधारणेची एक पद्धती आहे. कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी आपण साबण वापरतो.

शरीरांतर्गत संवेदनांचे दर्शन म्हणजे विपश्यना
साकोलीत उपक्रम : शाहैद कुरैशी यांचे प्रतिपादन
साकोली : विपश्यना ही ध्यानधारणेची एक पद्धती आहे. कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी आपण साबण वापरतो. कपड्यांचा, शरीराचा मळ या साबनाने आपण काढून टाकतो. आपल्या मनात साठवलेला मळ काढून टाकणारी विपश्यना ही साबणरूपी विद्या आहे. मन स्वच्छ, शुद्ध करणारी ही विद्या आहे. शरीराअंतर्गत संवेदनाचे दर्शन म्हणजे विपश्यना होय असे प्रतिपादन क्रीडासंघटक शाहिद कुरैशी यांनी केले.
येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालयात विपश्यना ध्यानसाधनाचे आयोजन आठवड्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक प्रकाश मस्के प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्याध्यापक मस्के यांनी ताणतणावमुक्तीच्या शिक्षणाची गरज व जीवन जगण्याची कला याविषयी मार्गदर्शन केले.
पर्यवेक्षक हिवराज येरणे यांनी सांगितले की, बरेचसे आभार हे मनावर अवलंबून असतात अशा आजारांची तीव्रता कमी होऊ लागते.
अनेक साधक या विधेमुळे भयानक व्यसनापासून मुक्त झालेले आहेत. विपश्यना ध्यानसाधनेत इयत्ता ५ ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना आणापान क्रीया मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी वर्ग घेतले जातात. यावेळी विद्यालयातील सर्व वर्गशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळाले. (तालुका प्रतिनिधी)