शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

आरोग्य केंद्रात ग्रामस्थांचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:51 AM

तालुक्यातील पोहरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारला रात्री ८ वाजतापासून ते १२ वाजतापर्यंत काही ग्रामस्थांनी धुमाकुळ घालून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्थानांतरणाची मागणी केली. या गदारोळात संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्यात. इमारतीच्या खिडक्यांचे तावदान, इमारतीमधील फर्निचर, कुलर आदी साहित्याचे तावदान, इमारतीमधील फर्निचर, कुलर आदी साहित्याची फेकाफेकी केली.

ठळक मुद्दे पोहरा येथील घटना : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी, रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील पोहरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारला रात्री ८ वाजतापासून ते १२ वाजतापर्यंत काही ग्रामस्थांनी धुमाकुळ घालून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्थानांतरणाची मागणी केली. या गदारोळात संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्यात. इमारतीच्या खिडक्यांचे तावदान, इमारतीमधील फर्निचर, कुलर आदी साहित्याचे तावदान, इमारतीमधील फर्निचर, कुलर आदी साहित्याची फेकाफेकी केली. त्यामुळे पोहरा येथील वातावरण आरोग्य यंत्रणेविरुध्द विरुद्ध तापले होते.याबाबत असे की, शनिवारला पोहरा येथील महिला रुग्ण कुरैशा फत्तू छव्वारे (५०) या सायंकाळी ४.३० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यात. त्यांचा रक्तदाब कमी झालेला होता व छातीत तीव्र वेदना होत होत्या. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना लाखनी येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांचे निधन झाले. छव्वारे जेव्हा रुग्णालयात आल्या होत्या तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.धम्मदीप बडोले रुग्णालयात नव्हते. ते किटाडी येथील मानव विकास कार्यक्रमात सहभागी झाले होते. डॉक्टर वेळेवर उपलब्ध राहत नसल्याचा रोष सायंकाळी पोहरावासीयांनी दवाखान्यावर काढला. रुग्णालयाला कुलूप लावण्यात आले. साहित्याची फेकाफेक करण्यात आली. वातावरण पेटल्यानंतर घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले.गटविकास अधिकारी धीरज पाटील, तहसीलदार मलीक विराणी, नायब तहसीलदार सोमनाथ माळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हटनागर यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा केली. डॉ.बडोले यांचे स्थानांतरण व्हावे यासाठी ग्रामपंचायतद्वारे निवेदन देण्यात आले. रात्री १२ वाजेपर्यंत लोकांचा जमाव रुग्णालयासमोर होता. जिल्हा आरोग्य विभाग आता कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल