बचत गट महिलांची आनंदवनला भेट : लघु उद्योगातून बेरोजगारीवर होणार मातभंडारा : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे बाबा आमटेंनी उभारलेल्या कुष्ठरोग्यांच्या आनंदवनला जिल्ह्यातील महिला बचतगटांनी भेट दिली. यावेळी आनंदवनातील कुष्ठरोगांकडून होत असलेल्या प्रकल्पाला व तेथील कला वस्तूंची न्याहाळणी केल्यानंतर उपस्थित महिलांना लघुउद्योगाचे बळ मिळाले. वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणा पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कक्ष व प्रकल्प कार्यान्वयीत यंत्रणा तालुका कृषी कार्यालय मोहाडी व विश्व मानव कल्याण मिशन गोंडपिपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयडब्लूएमपी ०६ मधील ग्रामस्थांनी आनंदवनला भेट दिली. यावेळी त्यांनी कुष्ठरोग्यांना समाजाने वाळीत टाकले. मात्र त्यांच्या हातात कला असल्याने आनंदवनातून त्यांनी कलाकृती तयार करून जगभरात विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. याची महती ऐकून जिल्ह्यातील पारडी, दहेगाव, महालगाव, पालडोंगरी, सिरसोली, आंधळगाव, अकोला (टोला), पिंपळगाव येथील ग्रामस्थ व महिला बचत गटाने आनंदवनला भेट दिली. यावेळी तेथील यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून तयार होत असलेल्या कलाकृत्रीची त्यांनी माहिती जाणून घेतली. त्यात सतरंजी विणकाम, सुतारकाम, पायदान, चटई विणकाम, स्कार्फ, बॅग, रुमाल, गांडूळ खत प्रकल्प, डेअरी विभाग, दुधाळ म्हशी व गाई तसेच जैव वायू प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. यातून रोजगार निर्मितीला वाव असल्याने त्यातून उद्योग उभारण्याची मनिषा महिला बचत गटाच्या महिलांना प्रेरणादायी ठरली. सहलीला तालुका कृषी अधिकारी के.जी. पात्रीकर, किशोर कळंबे, सेवक चिंधालोरे, बी.डी. दुधानी, सरोज राऊत आदींनी सहकार्य केले. ४२० प्रशिक्षणार्थ्यांनी यात सहभाग घेतला. (शहर प्रतिनिधी)
कुष्ठरूग्णांच्या कलाकृतीने भारावले ग्रामस्थ
By admin | Updated: January 9, 2016 00:51 IST