चिखलमय रस्त्यांमुळे तुटला गावाचा संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:01:16+5:30

शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून या भागात डांबरीकरणाच्या रस्त्यांचे बांधकाम केले असले तरी पावसाळ्याच्या दिवसात ट्रॅक्टरने शेतातून येणाºया चिखलमाती मुळे संबंधित रस्ते अवघ्या वर्षभरातच खड्डेमय होत असल्याची वास्तविकता आहे. याचा सर्वाधिक फटका गाव परिसरातील नागरिकांना रहदारीदरम्यान सहन करावा लागत असतो.

The village was cut off due to muddy roads | चिखलमय रस्त्यांमुळे तुटला गावाचा संपर्क

चिखलमय रस्त्यांमुळे तुटला गावाचा संपर्क

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांमध्ये अपघाताची भीती : जीव मुठीत घेऊन रहदारी

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : शेतात रोवणीसाठी ट्रॅक्टरने चिखलणी करतानाच चिखलाने माखलेले ट्रॅक्टर चिखल मातीसह रस्त्यावर काढले जात असल्याने चौरसातील सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. सदरच्या चिखलमय रस्त्यावरून पावसात ये जा करणाऱ्या वाहनधारक नागरिकांत अपघाताची भीती निर्माण झाली आहे. चौरास भागातील चिखलमय रस्त्यांनी अनेक गावाचा संपर्क तुटल्याचे चित्र आहे.
लाखांदूर तालुक्यातील विशेषत: चौरास भागात धानपीक रोवणीला वेग आला आहे. धान रोवणीसाठी चिखलणी साठी या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर करतात.
शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून या भागात डांबरीकरणाच्या रस्त्यांचे बांधकाम केले असले तरी पावसाळ्याच्या दिवसात ट्रॅक्टरने शेतातून येणाºया चिखलमाती मुळे संबंधित रस्ते अवघ्या वर्षभरातच खड्डेमय होत असल्याची वास्तविकता आहे. याचा सर्वाधिक फटका गाव परिसरातील नागरिकांना रहदारीदरम्यान सहन करावा लागत असतो.
या सबंध गैरप्रकाराची माहिती स्थानिक प्रशासनासह बांधकाम विभाग व वाहतूक नियंत्रण विभागाला असली तरी संबंधितांकडून हेतूपुरस्पर डोळेझाक केली जात असल्याचा आरोपही नागरिकांफर्ते केला जात आहे.
चिखलमय रस्ते होताना वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन गावांचा संपर्क तुटल्याने चौरसातील जनतेत नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतातून ट्रॅक्टरने चिखल माती सह रस्त्यावर येणाºया वाहन चालका विरोधात कार्यवाही करावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.

चिखलणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित ट्रॅक्टर चिखल मातीने भरलेल्या अवस्थेतच रस्त्यावर काढले जात असल्याने ट्रॅक्टरच्या चाकांना असलेले चिखल माती रस्त्यावर पडून पावसात अपघाताची भीती निर्माण झाली आहे. साधारण पावसात या भागातील रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहनाने ये-जा करणे धोकादायक ठरत असल्याने चिखलमय रस्त्यांमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Web Title: The village was cut off due to muddy roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.