शिकारी टोळीने केला शेतकऱ्याचा घात

By Admin | Updated: October 29, 2015 00:43 IST2015-10-29T00:43:42+5:302015-10-29T00:43:42+5:30

प्राण्यांची शिकार करण्याकरिता शिकाऱ्यांनी लावलेल्या वीज प्रवाहित ताराला स्पर्श झाल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

The victim attacked the farmer | शिकारी टोळीने केला शेतकऱ्याचा घात

शिकारी टोळीने केला शेतकऱ्याचा घात

सुंदरटोला येथील घटना : दोघे सुदैवाने बचावले, शिकारी टोळीवर अंकुश बसणार काय?
तुमसर : प्राण्यांची शिकार करण्याकरिता शिकाऱ्यांनी लावलेल्या वीज प्रवाहित ताराला स्पर्श झाल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यात त्याचे दोन सहकारी थोडक्यात बचावले. ही घटना तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सुंदरटोला शिवारात मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
बाळकिशन नारायण परतेकी (३५) रा. सुंदरटोला असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
बाळकिशन हे त्यांचे दोन मित्र विनोद फोकल परतेकी (३०), अविनाश महादेव उईके (२३) रा. सुंदरटोला यांच्यासोबत मंगळवारी रात्री पाळीव कुत्र्यासोबत शेतावरील पीक (धान) सुरक्षित आहे काय याची खातरजमा करण्याकरिता गेले होते. दरम्यान शिकारी टोळीने वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी शेत शिवाराजवळून गेलेल्या ११ केव्हीच्या विजेची लाईनवरून वीज तारांचे आकडे लावून लोंबकळत जमिनीवर ठेवले होते. मात्र, ही बाब त्यांना माहित नव्हती. येथून पाळीव कुत्रा सुखरुप जाऊन आला. याचवेळी बाळकिशन जात असताना त्यांना वीज प्रवाहीत तारांचा स्पर्श होताच ते जमिनीवर कोसळले व यातच त्यांचा मृत्यू झाला. तर नशिब बलवत्तर म्हणून विनोद व अविनाश सुदैवाने बचावला.
विनोद व अविनाश यांनी गावात येऊन घटनेची माहिती दिली. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा खंडीत केला. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात मागील अनेक महिन्यापांसून वीज तारांच्या सहाय्याने अवैध शिकार करणे सुरु आहे. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात वनविभागाला अपयश आले आहे. शहरात राहून जंगलाचे येथे संरक्षण केल्या जात आहे. येथे शिकाऱ्यांची टोळी व अधिकाऱ्यांत फिक्सींग तर नाही ना असा संशय व्यक्त केल्या जात आहे. दोन महिन्यापूर्वी या परिसरात दोन हरणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. तुमसर येथे मुंडे दाखल झाले आहेत. त्यांनी तिनही वनपरिक्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज आहे. अनिल खंडाते यांच्या तक्रारीवर गोबरवाही पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाढीवे करीत आहे.
(तालुका / शहर प्रतिनिधी)

Web Title: The victim attacked the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.