वाहनाने बालकाला चिरडले

By Admin | Updated: December 21, 2014 22:53 IST2014-12-21T22:53:45+5:302014-12-21T22:53:45+5:30

भंडाऱ्याहून नागपूरकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने ठाणा पेट्रोलपंप येथील १० वर्षीय बालकाला चिरडले. बुध्दघोष मनोहर गणवीर असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना काल शनिवारी

The vehicle crushed the child | वाहनाने बालकाला चिरडले

वाहनाने बालकाला चिरडले

जवाहरनगर : भंडाऱ्याहून नागपूरकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने ठाणा पेट्रोलपंप येथील १० वर्षीय बालकाला चिरडले. बुध्दघोष मनोहर गणवीर असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना काल शनिवारी रात्री ७.१५ वाजताच्या सुमारास जुना ठाणा राष्ट्रीय महामार्गावर घडली.
ठाणा पेट्रोलपंप येथील झोपडपट्टी वसाहतीमधील चार ते पाच मुले बुध्दघोष यांच्या घरासमोर शेकोटीभोवती जमले होते. या सर्वांनी समाजाच्या एका मेळाव्यात जेवण करायचे ठरविले. जेवण आटोपून परतीला येत असताना बुध्दघोषचे सोबती रस्ता ओलांडीत सुखरुप दुसऱ्या टोकावर पोहचले. मात्र बुध्दघोषला तसे जमले नाही. भंडाऱ्याहून नागपूरकडे भरधाव वेगाने सुपर रोड वरुन मार्गाक्रमण करीत असतांना बुध्दघोषला जोरधार धडक दिली. यात बुध्दघोष जागीच ठार झाला. घटनेची माहती मिळताच झोपडपट्टीतील जनता घटनास्थळाकडे धाव घेतली. जवाहनगर पोलिसांनी घटेची नोंद घेत अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला. तपास पीएसआय पंकज चक्रे करीत आहे.

Web Title: The vehicle crushed the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.