पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: July 7, 2025 18:59 IST2025-07-07T18:57:45+5:302025-07-07T18:59:03+5:30

मोहाडी तालुक्यातील पांजरा कान्हळगाव रस्त्यावर रविवारी, ६ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजेदरम्यान उसगाव (चांदोरी) येथील महिला घेऊन जाणारे वाहन उलटले.

Vehicle carrying laborers overturns, thirteen women in critical condition in bhandara | पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी

पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी

भंडारा : मोहाडी तालुक्यातील पांजरा कान्हळगाव रस्त्यावर रविवारी, ६ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजेदरम्यान उसगाव (चांदोरी) येथील महिला घेऊन जाणारे वाहन उलटले. या वाहनातील तेरा महिला जखमी झाल्याने त्यांना करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. तिथून पाच ते सहा महिलांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. अन्य जखमी महिलांना उपचारानंतर सुटी देण्यात आली.

ही घटना पांजरा ते कान्हळगावदरम्यान सकाळी घडली. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींमध्ये, सत्यभामा तेजराम बावनथळे (५५), रंजना शंकर नेणारे (५५), कचरा रमेश कापसे (६५), शांता जयराम नेवारे, फुलवंता तुळशिराम कवरे (५५, सर्व राहणार उसगाव) यांचा समावेश आहे, तर किरकोळ जखमीमध्ये हरजाना जलादीन शेख (३८), सुमन बाबूराव शेंद्रे (५०), शीतल शेखर वरकडे (२७), शांता जयराम नेवारे (६५), शिल्पा विठ्ठल वाढवे, अल्का ज्ञानेश्वर शेंद्रे (६३, सर्व राहणार उसगाव) यांचा समावेश आहे. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी निषा पांडे यांनी प्राथमिक उपचारानंतर किरकोळ जखमींना सुटी दिली.

अलका शेंद्रेंच्या पतीचा वर्षभरापूर्वीच अपघाती मृत्यू

वाहन उलटून मजूर जखमी होण्याची घटना घडून २४ तास उलटले. मात्र, या अपघाताची नोंद पोलिसांत नाही. यामुळे आश्चर्य व्तक्त होत आहे. अपघाताची नोंद न झाल्याने वाहन क्रमांक आणि वाहन मालकाचे नाव कळलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वााहन मुंढरी येथील असल्याचे समजते.

Web Title: Vehicle carrying laborers overturns, thirteen women in critical condition in bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात