हिवाळ्यातही किरकोळमध्ये भाज्यांचे दर वधारलेलेच
By Admin | Updated: December 27, 2015 00:55 IST2015-12-27T00:55:35+5:302015-12-27T00:55:35+5:30
गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात भाज्या स्वस्त असल्या तरीही किरकोळमध्ये महागच आहेत.

हिवाळ्यातही किरकोळमध्ये भाज्यांचे दर वधारलेलेच
भंडारा : गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात भाज्या स्वस्त असल्या तरीही किरकोळमध्ये महागच आहेत. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा भाव जास्त आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त आहे.
स्थानिक उत्पादकांकडून आवक वाढली आहे. त्यानंतरही मध्यमवगीर्यांना भाज्या महागच खरेदी कराव्या लागत आहे.
उत्पादकांना योग्य भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. वाहतुकीचा खर्च जास्त असल्यामुळे बाहेरून मालाची आवक कमी आहे. हिवाळ्यात भाज्या स्वस्त मिळाव्यात,अशी गृहिणींची मागणी आहे. (प्रतिनिधी)