जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी दिली जातात विविध कारणे; ६१ टक्के जणांना नाकारला ई-पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:19+5:302021-06-09T04:43:19+5:30
इंद्रपाल कटकवार भंडारा : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र तसेच राज्य सरकारने लॉकडाऊन व त्यानंतर संचारबंदी जाहीर ...

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी दिली जातात विविध कारणे; ६१ टक्के जणांना नाकारला ई-पास
इंद्रपाल कटकवार
भंडारा : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र तसेच राज्य सरकारने लॉकडाऊन व त्यानंतर संचारबंदी जाहीर केली. मात्र, विविध कारणांनी जिल्ह्याबाहेर पडणाऱ्यांनी विविध कारणे शोधली. यात ई-पास काढण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने डेटा भरला. यात दिलेली कारणे सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी आहेत.
यासंदर्भात ई-पासची स्थिती काय, याचा वापर केल्यानंतर हे वास्तव समोर आले.\I \Iजिल्ह्यात लॉकडाऊन काळात जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी जवळपास चार हजार ९९० जणांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले. यापैकी फक्त १९२९ जणांना जिल्ह्याबाहेर जाण्या-येण्याची मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
तसेच तीन हजार ६१ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. यात ई-पास अंतर्गत विविध कारणे दर्शविण्यात आली होती. मात्र, तपशील तपासणी करताना दिलेली माहिती योग्य नसल्याने सदर अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे पोलीस विभागामार्फत सांगण्यात आले. आता अनलॉक अंतर्गत रेडझोनमधून येणाऱ्यांसाठी ई-पास आवश्यक बाब ठरविण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पोलीस विभाग दक्ष दिसून येत आहे.
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी काहीही
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी काहींनी लाॅकडाऊन काळात घराबाहेर पडता आले नाही म्हणून कुठेतरी फेरफटका मारण्यासाठी वैद्यकीय कारणे दाखवून अर्ज सादर केले होते.
लग्नाला किंवा साक्षगंधासाठी बाहेर राज्यात किंवा अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी वैद्यकीय कारण दर्शविले होते, असे तपासाअंती समोर आले.
काहींनी तर जवळच्या नातेवाइकांचा मृत्यू झाल्याची बाब सांगितली तर कधी कधी ही बाब खोटी तर कधी सत्य निघाल्याचेही समोर आले. विशेष म्हणजे यापूर्वी ई-पास मंजुरी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येत होती. मात्र, आता ही जबाबदारी पोलीस विभागाकडे देण्यात आली आहे.
बॉक्स
सर्वांचीच मेडिकल इमर्जन्सी कशी?
ई-पास काढण्यासाठी दिलेल्या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. यात जवळच्या नातेवाइकांचा मृत्यू किंवा वैद्यकीय कारणाने ई-पाससाठी मंजुरी दिली जात होती. ४९९० अर्जांमध्ये सर्वांत जास्त कारणे ही वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वांची मेडिकल इमर्जन्सी कशी, असा सवालही पोलीस विभागाला यानिमित्ताने प्रत्ययास आला.
जिल्हा पोलीस प्रमुख म्हणतात...
कोविड-१९ अंतर्गत राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत ई-पास सुविधा देण्यात आली आहे. ज्या व्यक्तींनी अर्ज सादर केले, त्याची सखोल शहानिशा केल्यानंतर मंजुरी देण्यात येत आहे. नागरिकांनी योग्य प्रमाणपत्र सबमिट करावे, असे आवाहनही त्या अनुषंगाने करण्यात आले आहे.
- वसंत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा