प्रफुल्ल पटेलांनी ऐकून घेतल्या विविध समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:06+5:302021-07-20T04:24:06+5:30
चुल्हाड (सिहोरा) : जिल्ह्यातील सुप्रसिद्ध जागृत हनुमान देवस्थान चांदपूर येथे खासदार व माजी नागरी उड्डयनमंत्री प्रफुल्ल पटेल ...

प्रफुल्ल पटेलांनी ऐकून घेतल्या विविध समस्या
चुल्हाड (सिहोरा) : जिल्ह्यातील सुप्रसिद्ध जागृत हनुमान देवस्थान चांदपूर येथे खासदार व माजी नागरी उड्डयनमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी भेट देऊन हनुमंतांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी परिसरातील विविध समस्या ऐकून घेतल्या. सतेच त्या सोडविण्याचे आश्वासनही दिले.
यावेळी माजी सभापती धनेंद्र तुरकर यांनी चांदपूर जलाशयाच्या दार बंद होत नसल्यामुळे तीन महिन्यांपासून पाणी वाया जात आहे. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी कमी होत आहे आणि पाण्याचा योग्य उपयोग होत नाही. त्यामुळे दरवाजा त्वरित बंद करण्यात यावा, अशी मागणी केली. यावर्षी पावसाचा लपंडाव सुरू आहे. मेघराजा बसत नसल्यामुळे बळीराजा तिथेच आहे. शेतात केलेली धानाचे परे व पेरणी कडकडत्या उन्हामुळे वाळत आहेत. त्याकरिता येथील शेतकऱ्यांना चांदपूर जलाशयाचे पाणी लवकरात लवकर देण्यात यावे, तसेच सोंड्याटोला उपसा सिंचन योजना सुरू करण्यात यावी व पाणी अडवण्यासाठी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे दरवाजे बंद करण्यात यावे, कोरोना काळात मंदिर बंद असल्यामुळे परिसरातील दुकानदार त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या नियमाचे पालन करत मंदिर सुरू करावे. अशा अनेक मागण्या खा. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केल्या.
या क्षेत्रातील समस्यांवर माझे लक्ष आहे. त्याकरिता लवकर सर्व समस्या सोडवू, असे उपस्थितांना प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. यावेळी आ. राजू कारेमोरे यांनी सकारात्मक भूमिका घेत समस्यांवर लक्ष केंद्रित केले. यावेळी माजी खा. मधुकर कुकडे, आ. राजू कारेमोरे, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, माजी सभापती धनेंद्र तुरकर, उमेश तुरकर, तथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यापूर्वी जून महिन्यात सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी सिहोरा क्षेत्रात भेट दिली होती.