शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ऊठसूठ व्हॉट्सअँप, स्टेटस पाहताय, मेंदूत होईल केमिकल लोच्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 14:27 IST

Bhandara : वेळीच डॉक्टरांशी चर्चा करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : मोबाइलच्या आहारी जाणे, व्हॉट्सअँप, स्टेटस वारंवार पाहण्याची सवय अनेकांना जडल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर येत आहे. व्हॉट्सअँप, स्टेटस वारंवार पाहण्याचा मोह आवरत नसेल तर वेळीच डॉक्टरांशी चर्चा करा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

मोबाइलचे जसे चांगले फायदे आहेत, तसेच काही दुष्परिणामदेखील आहेत. मोबाइलच्या जास्त वापरामुळे अनेक समस्या समोर येत आहेत. त्यात मानसिक आरोग्यावर परिणाम अधिक होत असल्याचे दिसून येते. मोबाइलचा अतिवापर डोळ्यांसह मेंदूवरही परिणाम करत आहे. याबरोबरच आता व्हॉट्सअँप, स्टेटस वारंवार पाहण्याची सवयदेखील अनेकांना जडली आहे. झोपण्यापूर्वी किंवा झोपेतून उठल्याबरोबर अनेक जण मोबाइल हाती घेऊन व्हॉट्सअँप, स्टेटस पाहतात. हा प्रकार दैनंदिन बनला असेल तर मानसिक आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तज्ज्ञ सांगतात.

वारंवार मोबाइल पाहणे घातकवारंवार मोबाइल पाहणे, मोबाइलशिवाय कशातच मन न लागणे ही मानसिक आजाराची लक्षणे मानली जात आहेत. वारंवार मोबाइल पाहणे घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

मोबाइल वापरताना काय काळजी घ्याल?शक्यतो महत्त्वाचे काम असेल तरच मोबाइलचा वापर करावा. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्याउठल्या मोबाइल हाती घेऊ नये. कुटुंबातील लहान मुलांसमोर मोबाइलचा जास्त वापर करू नये. मानसिक आरोग्याचा विचार करून मोबाइलवर नियंत्रण ठेवणे शिकावे.

'नो-मोबाइल डे' पाळामोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकांना मोबाइलची सवय जडली आहे.तासन्तास मोबाइलमध्ये गुंतून राहण्यामुळे संवादाची दरी खूपच वाढत आहे.मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी व प्रत्यक्ष संवाद वाढविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस 'नो मोबाइल डे' हवा. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडियाdoctorडॉक्टरbhandara-acभंडारा