फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करा! पण जपूनच...

By Admin | Updated: December 9, 2015 00:48 IST2015-12-09T00:48:00+5:302015-12-09T00:48:00+5:30

सावधान ! फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप व टिव्टरचा वापर जरा जपूणच, जर सोशल मीडियावर सायबर कॉईम, घडला तर आय.टी. अँक्टनुसार तीन वर्षांची शिक्षा व एक लाखापर्यंत दंड होऊ शकतो.

Use Facebook, Whotswap! But without being ... | फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करा! पण जपूनच...

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करा! पण जपूनच...

तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते : तरूणाई धोकादायक वळणावर
भंडारा : सावधान ! फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप व टिव्टरचा वापर जरा जपूणच, जर सोशल मीडियावर सायबर कॉईम, घडला तर आय.टी. अँक्टनुसार तीन वर्षांची शिक्षा व एक लाखापर्यंत दंड होऊ शकतो.
आज विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात, फेसबुक, व्हॉट्सअँप व ट्विटर व इतर अ‍ॅपस् वापरणे तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहे. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांमध्ये ८० टक्के तरूणाई अग्रेसर आहे. सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेसुद्धा आहेत.
कळत-नकळत अनेकांचे आयुष्य धोक्यात आल्याच्या काही घटना समाजासमोर नेहमीच येतात. फेसबुकवर अज्ञात मुलींचे बनावट फेक अकाऊंट तयार करणे व त्याचा मिस युज करणे व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह ईल किंवा धार्मिक भावना दुखावणारे मॅसेज व फोटो टाकणे आदी विषयांसंदर्भात आय.टी. अँक्टच्या कलम ६६ (सी), (डी) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येतात. तरूणांना, विद्यार्थ्यांना याची कल्पनाही नसेल की, सोशल, मीडिया अंतर्गत सायबर क्राईम सिद्ध झाला तर तीन वर्षांची शिक्षा व एक लाखापर्यंत दंडाची तरतूद आहे. (शहर प्रतिनिधी)

नायझेरियन फ्रॉडच्या घटना वाढल्या
आॅनलाईन लॉटरी लागली म्हणून अकाऊंटमध्ये पैसे टाकायचे आहेत, असे म्हणून गंडविल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघड झाली होती. एका व्यक्तीला फोन आला. सांगण्यात आले की, मी आयडिया कंपनीचा मॅनेजर बोलतो. तुम्ही लकी विजेता ठरले आहात. पाच लाख रूपये तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी २०० रूपयांचे रिचार्ज करा व सविस्तर माहितीकरिता वरील क्रमांकावर कॉल करा मात्र याधीचे अनुभव पाहता ते बळी पडले नाही. नायझेरियन फ्रॉडच्या घटना वाढल्या

सोशल नेटवर्किंग
सोशल मीडिया म्हणजे काय? लोकांनी तयार केलेली संगणकीय माहिती जी शेअर करण्याकरिता बनविण्यात आलेली आहे, शेअरिंग म्हणजे त्यावर कमेंट करता आले पाहिजे, माहिती पाठविता आली पाहिजे, ज्याला बघण्याकरिता कुठलेही पैसे मोजावे लागत नाही आणि महत्त्वाचे म्हणजे ले लवकर उपलब्ध झाले पाहिजे.
सोशल मीडियामुळे आपण आपली माहिती ही आपल्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत इंटरनेटद्वारे शेअर करू शकतो.
सोशल नेटवर्किंग हा एक सामाजिक रचना ज्यामध्ये आपण एक दुसऱ्यांसमवेत एका विशिष्ट नात्याने जोडलेला असते. फेस फेसबुक, व्टिटर, मायस्पेस.यामाध्यमातून एकमेकांच्या संपर्कात येतो. मात्र, हे संपर्क कधीकधी धोकादाय ठरू शकतात.

सोशल मीडियाचा वापर करताना व फेसबुक किंवा व्हॉट्स अ‍ॅपवर कुठलाही धार्मिक भावना दुखावणारा मॅसेज आला तर तो फॉरवर्ड करू नका. तसेच कुठलाही फोन आला तरी वैयक्तिक माहिती देऊ नका. अल्पवयीन विद्यार्थ्यांनी सतर्क राहावे.
- दिलीप झळके
पोलीस अधीक्षक, भंडारा.

Web Title: Use Facebook, Whotswap! But without being ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.