घर बांधकामात, सळाखी ऐवजी बांबूंचा वापर

By Admin | Updated: June 22, 2014 23:53 IST2014-06-22T23:53:12+5:302014-06-22T23:53:12+5:30

आधुनिक युगात घर बांधकामासाठी अभियंते शक्कल लढवित असताना एका खेडे गावातील शेतकऱ्याने मागील १५ वर्षांपासून सलाखीऐवजी बांबूंचा वापर करून उसनभर घरे बांधून दिली.

Use the bamboo instead of the construction of the house | घर बांधकामात, सळाखी ऐवजी बांबूंचा वापर

घर बांधकामात, सळाखी ऐवजी बांबूंचा वापर

लाखो रूपयांची बचत : १५ वर्षांपासून प्रयोग सुरूच
लाखांदूर : आधुनिक युगात घर बांधकामासाठी अभियंते शक्कल लढवित असताना एका खेडे गावातील शेतकऱ्याने मागील १५ वर्षांपासून सलाखीऐवजी बांबूंचा वापर करून उसनभर घरे बांधून दिली. तालुक्यात व तालुक्याबाहेर हा प्रयोग सुरू असून बांधकाम चिरकाल टिकणार असा ठाम विश्वास जगण पिलारे यांनी व्यक्त केला.
म्हणतात ना, घर पहावे बांधून, या म्हणीला तोड म्हणून घर बांधकामाचा अर्धा अधिक खर्च कमी करण्याचा नवीन फंडा तालुक्यातील खैरीपट या छोट्याशा खेडेगावातील जगन पिलारे या व्यक्तीने शोधून काढला आहे. मागील १५ वर्षापासून त्यांचा हा प्रयोग सुरू असून अर्जुनी/मोर लाखांदूर तालुक्यात चर्चेचा झाला आहे. एकूणच घर बांधकामाचा बजेट कमी करण्याचा त्याचा हा प्रयत्न अनेकांनी कृतीत उतरविला आहे.
पिलारे यांनी सर्वप्रथम खैरीपट येथे आपले राहते घर सलाखी ऐवजी बांबुचा वापर करून तयार केले. एकूण घर बांधकामाच्या खर्चात २५ टक्के बचत होत असल्याचा अंदाज स्वत:चे दोन मजली इमारत बांधून पूर्ण केला. दोन मजली घरात हजारो क्विंटल धान्य साठवून ठेवणाऱ्या बकाऱ्या तयार केल्या. मात्र घराला अद्याप तडा गेला नाही. सध्या परिस्थितीत तिसरा माळा उभत्तरण्याचा त्यांचा मानस असून बांधकाम प्रगती पथावर आहे. आधुनिक युगात घर बांधकाम करण्यापूर्वी एका चांगल्या नामवंत अभियंत्याचा शोध घेतला जातो. सलाख सिमेंटचा बजेट तपासल्या जातो. यातच घर बांधकाम करणाऱ्याचे बजेट अवलंबून असते. मात्र यावर तोडगा जगण पिलारे यांनी काढला. अर्जुनी/मोर येथे दोन मजली बांबुचा वापर केलेली मोठी इमारत कौलाने उभी आहे. लाखांदूर येथे सुद्धा अनेक इमारती याच पद्धतीने बांधलेल्या आहेत. नव्हे तालुक्यात अनेक गावात अभियंत्याची भूमिका पार पाडत आतापर्यंत पंधरा ते वीस इमारतीचे बांधकाम पिलारे यांनी करून दाखविले. घर बांधकामातील सलाख एकदाची जंगले मात्र बांबु चिरकाव टिकत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पिलारे यांचा बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय असून नवीन घर बांधकाम करणाऱ्यांना बांबुचा वापर कसाकरावयाचा यावर ते मार्गदर्शन करत असतात. काहींना ते पटते. मात्र काहींना ते पटत नाही. फुंडे पेट्रोलपंप वडसा रोडवर असून येणारे जाणारे नवल म्हणून थांबतात व बांबुचावापर कसा केला जातो ते बघतात. बांबुचा वापर केलेला घर चिरकाल टिकतो का असा उलट प्रश्न करून पुढच्या मार्गाला लागतात. मात्र मागील पंधरा वर्षापासून बांबुचा वापर केलेल्या घरात अनेकाचे कुटूंब वास्तव्यात असून कुठलाच धोका अद्याप झाला नसल्याचा पिलारे यांनी सांगितले. घराचे बांधकाम करताना पायव्या पासून कॉलम, बिम, सज्जा, अखेर स्लॅबला सुद्धा पूर्णता बांबुच्या भांब्याचा पुर्णत: वापर केला जातो. कमी खर्चात घर बांधकामाचा वापर करून बजेट कमी करण्याचा आपला प्रयत्न असून नवीन घर बांधणाऱ्यांनी एकदा सलाखी ऐवजी बांबुचा वापर करावा म्हणून सांगून गेले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Use the bamboo instead of the construction of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.