पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयातील सेवा अद्यावत करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:59+5:302021-08-24T04:39:59+5:30
पालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा तत्पर करण्याच्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ललित नाकाडे वैद्यकीय ...

पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयातील सेवा अद्यावत करा!
पालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा तत्पर करण्याच्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ललित नाकाडे वैद्यकीय अधीक्षक यांना राष्ट्रवादी पक्षातर्फे ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत यांच्या पुढाकारातून निवेदन देण्यात आले.
पालांदूर ६० ते ७० गावांचे केंद्रबिंदू आहे. यात आरोग्य सेवा शासनाच्या पुढाकारातून उभी केलेली आहे. सुसज्ज भव्य भौतिक सुविधांसह ग्रामीण रुग्णालयाची इमारत आहे. सुसज्ज सदनिकासुद्धा आहे. परंतु यात आरोग्य सेवेचे घटक अपडेट नसल्याने रुग्णांना वेळेत व अपेक्षित सेवा मिळत नाही. प्रसंगी खासगीत पदरचे पैसे खर्च करून आरोग्य सेवा घ्यावी लागते. बऱ्याचदा रुग्णांना तालुका व जिल्हा येथे उपचारासाठी जावे लागते. प्रसंगी जीवसुद्धा धोक्यात येतो. अशावेळी गावातील ग्रामीण रुग्णालय सेवेत अपडेट असल्यास निश्चितच ग्रामीण रुग्णांना याचा फायदा मिळतो. कोरोना संकटकाळात ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेच्या खूप मोठा फायदा परिसरातील जनतेला झाला हे विशेष!
निवेदनानुसार डॉक्टरची रिकामी जागा भरणे, एक्स-रे मशीन लावणे, पोषण आहाराचा दर्जा सुधारणे, नियमानुसार १०८ ची सेवा पुरविणे, लॅबोरेटरी तंत्रज्ञ भरणे, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे आदी समस्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आले. त्याची प्रतिलिपी तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पुरविण्यात आले. निवेदन देतेवेळी ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत, जितेंद्र बोंद्रे अध्यक्ष युवक काँग्रेस तालुका लाखणी, हेमराज कापसे उपसरपंच तथा उपाध्यक्ष युवक काॅंग्रेस, आसिफ खान पठाण उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी, तंटामुक्त समिती अध्यक्ष पुरुषोत्तम भुसारी, पंकज खंडाईत, चंदू बावणे, राजेश देशमुख, दिलीप हटवार, सुखदेव बावनथडे, अमोल वैरागडे, नितेश चांदेवार, जयदेव हटवार, भूषण मेश्राम, ईश्वर हटवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
पालांदूर येथील रुग्णालयात असलेल्या समस्याचे निराकरण होण्याचे अनुषंगाने गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत यांनी डॉक्टर ललित नाकाडे वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी सकारात्मक चर्चा करून सेवा अपडेट करण्याची ग्वाही घेतली. तत्पूर्वी आमदार अभिजित वंजारी व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचे निगडित (स्वीय सहायक) राजू पालीवाल यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करीत समस्या उजागर केली. अगदी एक-दोन दिवसात रिकामी डॉक्टरची पोस्टसह इतर सुविधासुद्धा मिळणार असण्याचे संकेत मिळाले.