शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भंडाऱ्यात वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा; तीस घरांचे अंशत: नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 17:37 IST

साकोली तालुक्याच्या एकोडी येथे रात्री गारांसह वादळी पावसाने हजेरी लावली. मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात जोरदार वादळ सुटले. तर, भंडारा शहरात सोमवारी पहाटे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

ठळक मुद्देमाेहाडी व साकाेली तालुक्याला माेठा फटका

भंडाराअचानक आलेल्या वादळाचा जिल्ह्याला रविवारी रात्री माेठा तडाखा बसला. साकाेली तालुक्यातील एकाेडी येथे रात्री बाेराच्या आकारांचा गारांचा वर्षाव झाला तर परिसरातील गावातील ३० घरांचे अंशत: नुकसान झाले. माेहाडी तालुक्यातील करडी परिसरालाही वादळाचा तडाखा बसला असून अनेक घरावरील छप्पर उडून गेले. काही गावांत वीज खांब आणि वृक्ष उन्मळून पडले. तर शेतात असलेल्या धान पिकाचे नुकसान झाले.

रविवारी रात्री अचानक वादळी वाऱ्याला प्रारंभ झाला. विजांच्या गडगडाटात माेठ्या थेंबाच्या पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर वादळी पाऊस काेसळत हाेता. वीज पुरवठा खंडित झाल्याने परिसरात सर्वत्र अंधार पसरला हाेता. माेहाडी तालुक्यातील करडी, देव्हाडा, मुंढरी, निलज, पालाेरा, ढिवरवाडा, मांडवी, खमारी, माडगी, ढाेरवाडा, सुकळी काेका, काेथुर्णा, बेटाळा या गावांना वादळाचा माेठा तडाखा बसला आहे. अनेक घरांवरील छप्पर उडून गेले.

साकाेली तालुक्यातील एकाेडी परिसरातील बाम्पेवाडा, उमरझरी, एकाेडी, खांबा, जांभळी या गावांना माेठा तडाखा बसला. सुमारे ३० घरांचे अंशत: नुकसान झाले. एकाेडी मंडळात ४३ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. नुकसान झालेल्या सर्व घरांचे पंचनामे करण्यात येत आहे. वादळामुळे रस्त्यावरील अनेक वृक्ष उन्मळून पडले हाेते.

एकाेडी येथे गारांचा वर्षाव

साकाेली तालुक्यातील एकाेडी येथे रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास जाेरदार वादळ झाले. या वादळासाेबतच बाेराचा आकाराच्या गारांचाही वर्षाव झाला. शेतात असलेल्या उन्हाळी धानाच्या पिकाचे माेठे नुकसान झाले. कापून ठेवलेल्या धानाच्या गंजा ओल्या झाल्या आहेत. शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.

मुंढरी येथे झाडावर वीज काेसळली

माेहाडी तालुक्यातील मुंढरी येथे एका आंबाच्या झाडावर वीज काेसळून झाड पूर्णत: जळून गेले. ज्ञानेश्वर गाेंधुळे यांच्या घराशेजारी झाडावर रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अचानक वीज काेसळली. प्रचंड कडकडाट झाल्याने नागरिक भयभीत झाले. सुदैवाने या विजेमुळे घरांना आग लागली नाही.

टॅग्स :HailstormगारपीटweatherहवामानRainपाऊसbhandara-acभंडारा