शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

मिरेगावच्या मुख्याध्यापकाने गाजविले दिल्ली विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत डमदेव कहालकर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून शैक्षणिक साहित्याची निर्मिती आणि त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व रोजगारक्षम उपक्रम राबवितात. त्यांच्या या उपक्रमशीलतेची राज्यभरात ख्याती आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । दोन दिवस व्याख्यान, राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत मांडले विचार

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना अलिकडे नाव ठेवले जात आहे. प्रवेशासाठी शिक्षकांना विद्यार्थी शोधावे लागत आहेत. जिल्हा परिषद शाळांची अवस्था सर्वत्र बकाल झाली असताना एका उपक्रमशिल शिक्षकाने आपल्या शाळेचेच नाही तर संपूर्ण राज्याचे नाव उज्ज्वल केले. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय परिषदेत दोन दिवस व्याख्यान देऊन मिरेगावच्या शाळेचा डंका वाजविला.लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत डमदेव कहालकर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून शैक्षणिक साहित्याची निर्मिती आणि त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व रोजगारक्षम उपक्रम राबवितात. त्यांच्या या उपक्रमशीलतेची राज्यभरात ख्याती आहे. अशातच राष्ट्रीय शिक्षण नियोजन व प्रशिक्षण संस्थेने देशातील उपक्रमशील शाळांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी डमदेव कहालकर यांनी चित्रफित आणि बुकलेट तयार करून आपल्या शाळेची माहिती दिल्लीच्या निपा संस्थेला पाठविली. त्यांच्या या उपक्रमाने प्रभावित होऊन दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात आयोजित शैक्षणिक संशोधन परिषदेत व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले.दिल्ली येथे गत आठवड्यात झालेल्या या परिषदेत डमदेव कहालकर यांनी देशभरातील शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांसमोर व्याख्यान दिले.आपल्या उपक्रमांची माहिती दिली. शाश्वत बदल घडविण्यासाठी कल्पक बुद्धीने काय केले याची माहिती दिली. नैसर्गिक घडामोडीतून विद्यार्थ्यांना कसे शिकविता येते. भौतीक सुविधांचा आग्रह न धरता वर्तमानातून शैक्षणिक कार्य निष्ठेने कसे करता येते याची विस्तृत माहिती त्यांनी मांडली. त्यांच्या या व्याख्यानाने सर्वच अवाक झाले.देशभरातील शिक्षणतज्ज्ञांनी एकमेकांना दिलेली शैक्षणिक शिदोरी मी शेवटपर्यंत सांभाळणार आहे. मला मिळालेली नवी दृष्टी समाजाच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रकाशमान करेल. पुस्तकी ज्ञानासोबत निसर्गाच्या सहवासातून घेतलेले ज्ञान इतरांना प्रेरणादायी ठरेल. विद्यार्थी हा घटक महत्वाचा आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानगंगा प्रवाहित ठेवणार आहे.- डमदेव कहालकर, मुख्याध्यापक, मिरेगाव.

टॅग्स :delhiदिल्लीuniversityविद्यापीठ