तुमसरातील रेल्वेस्थानक झाडाखाली

By Admin | Updated: May 25, 2014 23:21 IST2014-05-25T23:21:34+5:302014-05-25T23:21:34+5:30

तुमसर- तिरोडी या ब्रिटीशकालीन रेल्वेमार्गावर तसेच तुमसर टाऊन येथील रेल्वेस्थानकावर शेडअभावी रेल्वे प्रवाशांना एका मोठय़ा वृक्षाच्या सावलीत उन्हापासून बचावाकरिता बसावे लागते. जागतिक दर्जाच्या सोयी

Under your local railway station tree | तुमसरातील रेल्वेस्थानक झाडाखाली

तुमसरातील रेल्वेस्थानक झाडाखाली

तुमसर : तुमसर- तिरोडी या ब्रिटीशकालीन रेल्वेमार्गावर तसेच तुमसर टाऊन येथील रेल्वेस्थानकावर शेडअभावी रेल्वे प्रवाशांना एका मोठय़ा वृक्षाच्या सावलीत उन्हापासून बचावाकरिता बसावे लागते. जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा पुरविण्याचा दावा करणार्‍या रेल्वे प्रशासनाचे येथे पितळ उघडे पडले आहे.

तुमसर रोड दक्षिण पूर्व रेल्वे स्थानक ते मध्य प्रदेशातील तिरोडी स्थानकापर्यंत आठ रेल्वे स्थानक आहेत. तुमसर टाऊन रेल्वेस्थानक शहरात आहे. या रेल्वेस्थानकावर प्रवाशांना बसण्याकरिता शेड नाही. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून पुरुष व महिला प्रसाधनगृह नाहीत. पावसाळ्यात व उन्हाळ्यात पाऊस व उन्हापासून बचावाकरिता रेल्वे स्थानकावरील झाडाखाली गाडीची प्रतिक्षा करावी लागते.

रेल्वे स्थानकातील प्रतीक्षागृहात पंखे नाहीत. कूपनलिकेतून प्रवाशांना पाणी प्यावे लागते. वृद्ध महिला व पुरुषांना उन्हाळात सूर्य आग ओकू लागत असताना त्यांचा जीव धोक्यात आला आहे. येथे रेल्वे प्रशासन समस्या सोडविण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.

या मार्गावर दिवसातून चार प्रवासी गाड्यांचे ये - जा सुरु आहे. नागपूर (इतवारी) पर्यंत थेट गाडी असल्याने प्रवाशी मोठय़ा संख्येने येथे आहेत. परंतु सुविधांच्या अभावी शेकडो प्रवासी इतर साधनांनी जाण्याला प्राधान्य देतात.

ब्रिटिशकालीन रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानक एक वारसा म्हणून व रेल्वे प्रशासनाला दररोज हजारोंचे उत्पन्न देणार्‍या मार्गावरील रेल्वे स्थानक टिकवून ठेवण्याची येथे गरज आहे. ही रेल्वे स्थानके येथे इतिहासाची आठवण करून देतात. त्या आठवणींना येथे उजाळा देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Under your local railway station tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.