उमरी गाव झाले "स्मार्टग्राम"
By Admin | Updated: May 6, 2017 00:27 IST2017-05-06T00:27:00+5:302017-05-06T00:27:00+5:30
तालुक्यातील उमरी गावाला स्मर्टग्रामने सन्मानित करण्यात आले.

उमरी गाव झाले "स्मार्टग्राम"
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : तालुक्यातील उमरी गावाला स्मर्टग्रामने सन्मानित करण्यात आले.
महराष्ट्र शासनाने स्मार्टग्राम ही योजना रूजविलेली होती. या स्पर्धाकरिता काही नियमावली शासनाने ठरवून दिलीे. स्पर्धेकरिता तालुक्यातील ग्रामपंचायतीनी सहभाग घेतलेला होता. परंतु उमरी चौ. येथील सरपंच प्रमोद खरकाटे व ग्रामसेवक गौतम खंडाळे, ग्रामपंचायत सदस्य गण तथा समस्त उमरी ग्रामवासी जनतेने घेतल्याने संपूर्ण पवनी तालुक्यामध्ये उमरीला दहा लक्ष रूपयांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. पालकमंत्री डॉ. दिपक सावंत यांचे हा सरपंच व सचिवांनी हा पुरस्कार स्विकारला.