शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

‘उज्ज्वला’ने आणले डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:32 IST

आम आदमी की सरकार म्हणत ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना महागाईच्या कचाट्यात ढकलले आहे. सामान्यांकरिता ‘उज्ज्वला’च्या पुढाकारातून घरोघरी गॅस पोहोचला. पण गॅसचा भडका एवढा भयावह झाला की सामान्यांना न परवडणारा झाल्याने ग्रामीण भागात चुल पुन्हा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देगॅसचा दर हजारी पार : ग्रामीण भागात चूल फुंकण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदुर : आम आदमी की सरकार म्हणत ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना महागाईच्या कचाट्यात ढकलले आहे. सामान्यांकरिता ‘उज्ज्वला’च्या पुढाकारातून घरोघरी गॅस पोहोचला. पण गॅसचा भडका एवढा भयावह झाला की सामान्यांना न परवडणारा झाल्याने ग्रामीण भागात चुल पुन्हा सुरू झाली आहे. गॅसने हजाराचा आकडा पार केल्याने गरिबांनी गॅस घेणेच बंद केले आहे.धूरमुक्त चुल सजविण्याकरिता केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून अल्पत्य किंमतीत गरिबांना मोफतच म्हणायला हरकत नसलेला गॅस दिला.एकीकडे महिलांचे आरोग्य नजरेसमोर ठेवून योजनेचा गाजावाजा धुमधडाक्यात केला. पाहता-पाहता पाचशेच्या घरातील गॅस आता दुपटीच्याही पुढे गेल्याने गरिबांनी गॅस हंडा घेणेच बंद केले आहे. ही एक प्रकारची गरीबांची चेष्टाच असल्याचे मत समाजात व्यक्त होत आहे.जंगले टिकावीत, प्रदूषण टळावे, महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे याकरीता योजना तंतोतंत खरी आहे. मात्र जगाच्या महागाईत सामान्य भरडला जावू नये. त्याला त्याच्या ऐपतीत गॅस घेता यावा. गॅसच्या अल्प अनुदानाकरिता दिवसभर राष्ट्रीयीकृत बँकेत रांगेत ताटकळत उभे राहता कामा नये याकरिता ठोस उपायांची तरतूद नसावी का, असा प्रश्न उभा झाला आहे.शपथपत्राने केरोसीन बंदउज्ज्वला योजेतून गॅस गरिबांचा घरात पोहोचला. गॅसने आवड निर्माण केली. मायमाऊ ली जाम आनंदात धूरमुक्त चुलींवर उभी राहून श्रीमंतासारखी स्वयंपाक करू लागली. पण तिला हे ठाऊक नव्हते की माझा हक्काचा केरोसीन बंद होईल. उज्ज्वला व गॅसचा काही एक संबंध असेल. यातच तिची पंचाईत झाली. ग्रामीण भागात शेतकरी, मजूर वर्गाला किमान केरोसीन लागतोच. खंडित विजेचे तुणतुणे नेहमीच वाजत असते. ‘शेर शिजला अन् विस्तव विझला. इन-मीन-तीन आणि हांडीसकट तीन’ अशी ग्रामीण कुटूंब अवस्था नसल्याने सगळ्याच कामात गॅस उपयोगात शक्य नाही. ‘गल्लीतला निर्णय दिल्लीत’ होत असल्याने गरिबांची सुमार पंचाईत झाली आहे. हमी/शपथपत्रात नमूद असलेली कायद्याची माहिती व त्यातून होणारी शिक्षा सामान्यांना अडचणीत आणणारी ठरली आहे. लिटर, दोन लिटरकरिता आम्ही सरकारचे दोषी होणार नाही. सरकारला इतर कामातील भ्रष्टाचार चष्मा लावूनही दिसला नाही. मात्र आम्हा गरिबांच्या शिधापत्रिकेवरील केरोसीन केवळ लिटरमागे सुमारे वीस रुपयांची तरतूद डोळाभर दिसल्याने आम्ही केरोसीन घेणार नाही. सामान्यांची ही तर गळचेपी करण्याची नियोजितबद्ध चाल असल्याची प्रतिक्रिया गरिबांनी ‘लोकमत’कडे व्यथीत मनाने कथन केली आहे.