■ अपुऱ्या अव्यवस्थेमुळे धानाची पोती उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST2021-03-28T04:33:09+5:302021-03-28T04:33:09+5:30

चुल्हाड (सिहोरा) : धान उत्पादक पट्ट्यातील सिहोरा परिसरात गोदामाच्या अभावाने धानाची पोती खरेदी केंद्रावर उघड्यावर ठेवण्यात आली आहेत. या ...

उघड Insufficient clutter to open the grain bag | ■ अपुऱ्या अव्यवस्थेमुळे धानाची पोती उघड्यावर

■ अपुऱ्या अव्यवस्थेमुळे धानाची पोती उघड्यावर

चुल्हाड (सिहोरा) : धान उत्पादक पट्ट्यातील सिहोरा परिसरात गोदामाच्या अभावाने धानाची पोती खरेदी केंद्रावर उघड्यावर ठेवण्यात आली आहेत. या धानाच्या पोत्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. येथील अपुऱ्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांची थट्टाच करण्यात येत असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत.

सिहोरा परिसरात बारमाही सिंचनाची सोय असल्याने शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेत आहेत. चांदपूर जलाशयाचे पाणी खरीप आणि उन्हाळी धान पिकांना वितरित करण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता तथा कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध कृती आराखड्याने परिसरातील शेत-शिवारात पाण्याचे वितरण करण्यात येत आहे. यामुळे परिसरात धानाचे उत्पादन अधिक प्रमाणात शेतकरी घेत आहेत. खरीप आणि उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. खरीप हंगामातील धान खरेदीने हाऊसफुल्ल असणारे खाजगी गोदाम रिकामे करण्यात येत नाही. यामुळे तीन महिन्यांच्या अवधीत पुन्हा उन्हाळी धान खरेदी प्रक्रिया येत असल्याने संस्थाना पोती सुरक्षित ठेवण्यात अडचणी येत आहेत. या परिसरात धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. धानाची पोती उघड्यावर ठेवण्यात आली असली तरी बहुतांश पोत्यांना वाळवी लागली असल्याचे चित्र आहे. उघड्यावर असणाऱ्या पोत्यांची नासधूस जनावरे करीत आहेत. खरेदी केलेल्या धानाची पोती शासनाच्या अखत्यारीत येत असली तरी बारदानाअभावी केंद्राबाहेर असणारी पोती शेतकऱ्यांची आहेत. या पोत्यांची जनावरांनी नासधूस केली आहे. अवकाळी पावसाचा फटकाही या पोत्यांना बसला आहे. सिहोरा परिसरात गोदाम नसल्याने हे विदारक चित्र निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

काखेत कळसा अन् गावाला वळसा

शासकीय इमारतीचे बांधकाम करताना जागेची समस्या येत आहे. परंतु जागेची समस्या गावात नाही. गावात आता सिमेंट रस्ता, नाली बांधकाम, सभामंडपाचा अनुशेष नाही. बांधकाम मंजुरीचा अतिरेक होताना दिसून येत आहे. गावकुशीबाहेरील रस्ते सिमेंटचे झाले आहेत. कंत्राटदार पांदण रस्तेही सिमेंटचे करण्याच्या नादात आहेत. परंतु शेतकऱ्यांची कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी गोदाम निर्मितीला विकासाच्या श्रेणीत आणले जात नाही. यामुळे अवकाळी पावसाचा कहर सुरू होताच शेतकऱ्यांचे रडगाणे सुरू होत आहे.

Web Title: उघड Insufficient clutter to open the grain bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.