यू-डायसमध्ये शाळेची माहिती चुकीची !

By Admin | Updated: January 14, 2016 00:41 IST2016-01-14T00:41:06+5:302016-01-14T00:41:06+5:30

शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांची माहिती एका क्लिकवर प्राप्त व्हावी, यासाठी यू-डायसमध्ये नोंदी घेतलेल्या आहेत.

U-Dias school information is wrong! | यू-डायसमध्ये शाळेची माहिती चुकीची !

यू-डायसमध्ये शाळेची माहिती चुकीची !

भौतिक सुविधांची माहिती दडपली, तज्ज्ञांचे चुकीचे निर्देश, शिक्षण विभागाचा जावईशोध
प्रशांत देसाई भंडारा
शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांची माहिती एका क्लिकवर प्राप्त व्हावी, यासाठी यू-डायसमध्ये नोंदी घेतलेल्या आहेत. राज्यातील एकही शाळा इमारत विरहीत नाही. त्यामुळे अत्री शाळेची माहिती भरताना तज्ज्ञांच्या सूचनेनुसार शाळेला एक वर्गखोली उपलब्ध असून पिण्याच्या पाण्याची सोय असल्याची खोटी माहिती भरण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
पवनी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या अत्री येथील जिल्हा परिषद इमारतीचे वास्तव लोकमतने मांडले आहे. यात यू-डायसची माहिती आता समोर आली असून यात शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालकांची कुचंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे.
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण असले तरी, इमारत निर्लेखित झाली असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने मागील वर्षीपासून सर्व शाळांची माहिती तात्काळ उपलब्ध व्हावी, यासाठी शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती यू-डायसमध्ये नोंदविली जात आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीच त्यांच्या अकार्यक्षमेतुळे येथील शाळांची वास्तविकता चव्हाट्यावर येण्याच्या भीतीने नवी शक्कल शोधून काढत यू-डायसलाच चपराक दिली आहे. अत्री येथील शाळेची अद्यावत माहिती यू-डायसवर नसल्याने जिल्ह्यातील अन्य शाळांच्या भरलेल्या माहितीबाबतही शंका उत्पन्न होत आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे शासनाला शाळांची अद्यावत माहिती उपलब्ध होवू शकत नाही व अशामुळेच शाळा सोयीसुविधांपासून वंचित राहणार आहे.

शिक्षण विभागाचा जावईशोध
विद्यार्थ्यांना शाळेत भौतिक सुविधा करून देणे शिक्षण विभागाचे कर्तव्य आहे. परंतु, अत्री शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने ती होणे गरजेचे आहे. मात्र, शिक्षण विभागाने जावईशोध करून गावातील सार्वजनिक नळावरून पिण्याचे पाणी भरण्याचे सुचविले व शाळेत पाण्याची व्यवस्था असल्याची नोंद यू-डायसमध्ये करण्यात आली.
राज्यातील जिल्हा परिषदची एकही शाळा इमारत किंवा वर्गखोली विरहित नाही. परंतु अत्री येथील दोन्ही वर्गखोली निर्लेखित झाल्याने ही माहिती यू-डायसमध्ये नमूद करण्यात आल्यास शिक्षण विभागाचा दांभिकपणा उघड होणार असल्याने पवनी पंचायत समितीने शिक्षकांना माहिती भरण्याचे प्रशिक्षण ठेवले होते. तज्ज्ञांनी दोन्ही वर्गखोली सुस्थितीत असल्याची माहिती भरण्याच्या सूचना मुख्याध्यापकाला दिलेल्या होत्या.

Web Title: U-Dias school information is wrong!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.